![]()
आमदार सतेज पाटील यांचा घनाघात
आजरा : प्रतिनिधी

सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलेली असून ही सरकारच्या डोळ्यावरची पट्टी काढायचं काम आम्हाला करावं लागणार आहे. असा घनाघात आमदार सतेज पाटील यांनी केला. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी एकवटलेल्या बळीराजाला संबोधित करताना ते बोलत होते. याअगोदर कोणत्याही प्रकल्पाना विरोध झालेला नाही. मात्र शक्तिपीठ महामार्ग हा केवळ ठेकेदार आणि भांडवलदार यांना पोसण्यासाठी होत असल्यामुळे याला आमचा विरोध आहे. असे आमदार पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आणि शेतजमिनीच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी पैशाच्या किंवा कोणत्याच अमिषाला बळी न पडता आपल्या वाडवडलांच्या जमिनी लाटू देऊ नका. असे आवाहन करून हजारो एकर शेतजमीन उद्योजकांच्या घशात घालण्याचा घाट सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर गरज नसलेल्या शक्तिपीठाविरोधात सर्वजण एकत्र लढा देऊया आणि गणेशोत्सवानंतर या विरोधात लढा आणखीन तिव्र करूया. असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
