अकीवाट व गणेशवाडीतील लाकडी होड्यांना डिझेल इंजिनसाठी ८.४७ लाखांचा निधी मंजूर

Loading

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून निधी

जयसिंगपूर : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील अकीवाट व गणेशवाडी या दोन गावांतील नागरिकांच्या बहुप्रतीक्षित मागणीला यश मिळाले आहे. या गावांमध्ये पारंपरिक लाकडी होड्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, या होड्यांवर डिझेल इंजिन बसवण्याची गरज नागरिकांनी वेळोवेळी आमदार यड्रावकर यांच्याकडे व्यक्त केली होती. या मागणीची दखल घेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ८.४७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
७ ऑगस्ट २०२५ रोजी शासनाने अधिकृत आदेश जारी करत हा निधी विशेष बाब म्हणून मंजूर केला आहे. सध्या या भागात नदी ओलांडण्यासाठी नागरिकांना पारंपरिक होड्यांचा वापर करावा लागतो. विशेषतः शेतकऱ्यांना शेतात जाताना या होड्यांचा आधार घ्यावा लागत होता, या गावातील नागरिकांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे या होड्यांना डिझेल इंजिन बसवण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ८ लाख ४७ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे वेळेची बचत, सुरक्षितता आणि सुलभता याचा त्रिसूत्रीचा लाभ नागरीकांना होणार आहे.
या निर्णयामुळे अकीवाट व गणेशवाडीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून,
या डिझेल इंजिनमुळे नदी पार करण्यासाठीचा त्रास आता वाचेल व जलप्रवास सुखकर होईल.
ग्रामीण भागातील मूलभूत गरजांकडे लक्ष देत त्यांची मागणी पूर्ण केल्याने अकिवाट व गणेशवाडी येथील नागरीकांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आभार मानले आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *