![]()
दि न्यू इंग्लिश स्कूल च्या लाठी काठी शिबीराला उदंड प्रतिसाद
चंदगड: तातोबा गावडा-
सध्याच्या काळात प्रत्येक मुलामुलींसाठी लाठी काठी कला शिकणे काळाची गरज आहे. लाठी काठी म्हणजे भारतातील मार्शल आर्ट असून लाठीकाठी या खेळासह सर्व मैदानी खेळाचे प्रशिक्षण मुलामुलींनी घ्यावे असा मौलिक संदेश लाठी काठी तज्ञ प्रसाद कलाल यांनी दिला. दि न्यू इंग्लिश स्कूल च्या लाठी काठी शिबीराला उदंड प्रतिसाद लाभला. दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे मोफत लाठी काठी प्रशिक्षण संपन्न झाले. शिबीरात तालुक्यातून १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

प्राचार्य आर. पी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिबीरामध्ये लाठी कु. पूर्वा पाटील, वेदांत गावडे यांचे काठी, दंड साखळी, सरळ काठी, मान काठी, तलवार, दांडपट्टा असे विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक झाले. या शिबीराचे आयोजन संजय साबळे, ग्रंथपाल शरद हदगल यांनी केले. यावेळी एम.व्ही. कानूरकर, टी.व्ही. खंदाळे,सचिन शिंदे, ओंकार पाटील,मधु तेजम, सागर कुंभार उपस्थित होते.


