![]()
विरोधासाठी आजरा संघर्ष समितीचा १८ ऑगस्ट रोजी धडक मोर्चा
आजरा : हसन तकीलदार
१२ जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठच्या विरोधात लढत आहेत. हा मार्ग शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला उध्वस्त करणारा आहे. त्यातच भर म्हणून चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी नव्या मार्गाची मागणी करून शेतकऱ्यांच्या जमिनी आणि इथल्या निसर्गाची नासाडी करण्याच्या शासनाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळं आजची बैठक ही आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आहे. लढ्याचे नियोजन करण्यासाठी आहे. असे मुकुंद दादा देसाई म्हणाले. शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना व पर्यावरणाला उध्वस्त करणारा असल्याने या विभागातीलशेतकऱ्यांचा विरोध दर्शवण्यासाठी सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी आजरा तहसील कार्यालयावरधडक मोर्चा काढण्याचा निर्णय आज आजरा येथे झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यातआला. अध्यक्षस्थान नावावरून मुकुंद दादा बोलत होते. दि.१८ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मोर्चाला आ. सतेज पाटील, माजी खा. राजू शेट्टी आणि माजी आमदार राजेश पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तेव्हा सर्वांनी या मोर्चासाठी प्रचंड संख्येने हजर राहण्याचे आवाहन शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केले आहे.
केवळ अडानी यांच्यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग होत असल्याचा आरोप यावेळी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यांनवर यांनी केला. अडानीची खनिजे गडचिरोलीहुन गोवा मार्गे परदेशात पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना बळी दिले जात आहे.शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा हा डाव आहे. त्यामुळे आमचा या महामार्गाला विरोध आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बळीराजा संघटनेचे नितीन पाटील यांनी “यासाठी प्रबोधन करणे गरजेचे असून ते आपण सगळे मिळून करू.” असे सांगितले. शिवसेनेचे (उबाठा ) तालुकाध्यक्ष युवराज पोवार यांनीही शक्तिपीठाला विरोध नोंदवला. तर आजरा तालुक्यात अनेक प्रकल्प झाले त्यातील विस्थापितांचे अजून पुनर्वसन झालेले नाही,असे असताना हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी का मारला जात आहे? या महामार्गाला पूर्णशक्तीनिशी विरोध करूया असे आवाहन मुकुंद दादा यांनी केले.
यावेळी तानाजी देसाई, उमेश आपटे, दशरथ घुरे, शांताराम पाटील, नागेश चौगुले,बाळू पाटील, गोविंद पाटील, शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे यांनीही मनोगत व्यक्त केली. प्रारंभी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी विद्याधर गुरबे, अल्बर्ट डिसोझा, रवी भाटले, रामदास पाटील,संजय तरडेकर, प्रकाश शेटगे, किरण पाटील, नारायण भडांगे, संभाजी सांबरेकर, विष्णू पाटीलयांच्यासह दाभिल, शेळप, घाटकरवाडी, पारपोली, जेऊर, चितळे, भावेवाडी येथील कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.
