जयसिंगपूर / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने पन्हाळगडावरून काढण्यात आलेली ‘महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे’ आज जयसिंगपूर येथील क्रांती चौकात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील नदी संगमाच्या पाण्याचे कलश नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द करून रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले.
महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातून या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे त्यापैकी कोल्हापूर विभागातून आज पन्हाळगडावरून या गौरव यात्रेला सुरुवात झाली. या गौरव रथयात्रेमध्ये सुमारे सातशे वाहने सहभागी होते.
राज्यातील सहा विभागांमधून अशा गौरव यात्रांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व रथयात्रा ३० एप्रिल रोजी मुंबईत एकत्र येणार आहेत. एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शोभायात्रा, तसेच राज्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी नामदार हसन मुश्रीफ, आमदार इद्रिस नायकवडी, युवराज पाटील, संतोष धुमाळ (पन्हाळा), विकास पाटील (कागल), शिरोळ तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर, विधानसभा कार्यक्षेत्र अध्यक्ष अमरसिंह पाटील, अजय पाटील यड्रावकर, मुनिर शेख, पै. केशव राऊत, संजय नांदणे, शहराध्यक्ष असलम फरास, कुरुंदवाड शहराध्यक्ष राजू घारे, दिग्विजय माने, अमोल शिंदे, प्रतीक कुन्नुरे, मुसादिक पटेल, महादेव कोळी, प्रशांत कांबळे, जयसिंगपूर यांच्यासह शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ही गौरव रथयात्रा सांगली येथील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुपूर्द करून या यात्रेचे सांगलीकडे प्रयाण झाले.
Posted inanveshanlive24 Maharashtra
महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे जयसिंगपुरात उत्फूर्त स्वागत

