अब्दुललाट : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या शादी महालाच्या इमारतीचा पाया खुदाई (भूमिपूजन) सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला. पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाला शिरोळचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत, या शादी महालासाठी ३० लाख रुपयांचा निधी देण्यात आले असून यापुढेही मुस्लिम समाजाच्या सर्वांगीणी विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे सांगितले.
आपल्या भाषणात आमदार यड्रावकर यांनी सांगितले की, अब्दुललाट, शिरदवाड व शिवनाकवाडी परिसरातील मुस्लिम समाजासाठी हा शादी महाल अत्यंत उपयुक्त ठरेल. सामाजिक कार्यक्रम, विवाह सोहळे तसेच विविध उपक्रमांसाठी ही इमारत एक महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी जपलेला भाईचारा, शांतता आणि एकोपा याचे त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य श्रद्धाताई गायकवाड, शिरोळ पंचायत समितीचे नूतन सभापती मिलिंद कुरणे, अविनाश गायकवाड, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष राजे खान शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शादी महालाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. आमदार यड्रावकर यांचा सत्कार राजे खान शेख यांच्या हस्ते करण्यात आला, तर पंचायत समिती सदस्यांचा सत्कार युनूस हासुरे यांनी केला. विजय भोजे यांचा सत्कार अब्बास नदाफ यांनी केला. उपस्थितांचे स्वागत हाजी सुलतान सर यांनी गुलाब पुष्प देऊन केले.


यावेळी जवाहर केन कमिटीचे चेअरमन दादासो सांगावे, कोल्हापूर जिल्हा सूतगिरणीचे व्हाइस चेअरमन आप्पासो चौगुले, संचालक एस. के. पाटील, बाळासो पाटील, पतसंस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील, माजी सरपंच संजय पाटील, प्रा. संजय परीट, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल सांगावे, संदीप बोदगे, संजय आवळे, संजय मगदूम, महावीर सांगावे, माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी, कॉ. आप्पा पाटील, वसंत कुरुंदवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच मुस्लिम समाजातील हाजी शौकत मुल्ला, असलम हारुगिरे, रियाज नाईक, नुरुद्दीन खानापूरे, फारूक मुल्ला, चांद जमादार, सादिक मुल्ला, मुन्ना मुल्ला, हाजी मोहम्मद नांदणीकर, इलाई मामू हसुरे, फैयाज नाईक, अल्ला बकश आवटी यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.
याशिवाय दादासो पाटील, के. बी. मुल्ला, जकरिया मुल्ला, सादिक मळवाडे, पोलीस पाटील मानसिंग भोसले तसेच कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष माने संतोष माने आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरला.