![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशाने जयसिंगपूर नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडीसाठी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये पिठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये विषय समितीच्या अध्यक्षांच्या व सदस्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.
लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीचे पक्षप्रतोद म्हणून सर्व विषय समितीच्या सदस्यांचे नामनिर्देशन पिठासन अधिकारी यांच्याकडे सादर केले, त्याची छाननी झाल्यानंतर सर्व समित्यांच्या सभापती पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात आली.दुपारी चार वाजता विशेष समितीच्या सर्व सदस्यांची व नवनिर्वाचित अध्यक्षांची नावे पीठासन अधिकारी यांनी जाहीर केली.
स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून शाहू आघाडीचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची तर स्थायी समिती सदस्य म्हणून शाहू आघाडीचे बजरंग खामकर, महेश कलकुटगी तर शिरोळ विकास आघाडीच्या संजय पाटील कोथळीकर यांची निवड करण्यात आली.सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी शाहू आघाडीच्या सचिन निटवे यांची तर या समितीमध्ये शाहू आघाडीच्या तेजश्री राहुल पाटील, अर्जुन देशमुख, सुमैंया कडबी, उज्वला वाघवेकर, रूपाली बंडगर व शिरोळ विकास आघाडीच्या संतोष जाधव यांची निवड करण्यात आली.शिक्षण क्रीडा आणि सांस्कृतिक कार्य समितीच्या अध्यक्षपदी पदसिद्ध सभापती म्हणून उपनगराध्यक्ष अनुराधा आडके यांची तर या समितीमध्ये शाहू आघाडीच्या तबसूम फरास, गिरमल कोळी, अर्चना आडगाने, सचिन चौगुले, रूपाली बंडगर तर शिरोळ विकास आघाडीचे गुंडाप्पा पवार यांची निवड करण्यात आली.स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी शाहू आघाडीच्या पराग पाटील यांची तर सदस्य म्हणून शाहू आघाडीचे अर्जुन देशमुख मीनल नांद्रेकर, गिरमल कोळी, सचिन चौगुले, अर्चना आडगाने यांची तर शिरोळ विकास आघाडीच्या रंगराव पवार यांची निवड करण्यात आली.
पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी शाहू आघाडीच्या लक्ष्मण गोसावी यांची तर सदस्य पदी शाहू आघाडीच्या तबसूम फरास, सुमय्या कडबी, महेश कलकुटगी, रूपाली बंडगर, तेजश्री पाटील तर शिरोळ विकास आघाडीच्या पंकज गुरव यांची निवड करण्यात आली.नियोजन समितीच्या सभापती पदी शाहू आघाडीच्या गीता भोसले यांची तर या समितीच्या सदस्यपदी शाहू आघाडीचे सचिन चौगुले, तबसूम फरास, अर्जुन देशमुख, उज्वला वाघवेकर, गिरमल कोळी तर शिरोळ विकास आघाडीच्या संजय पाटील कोथळीकर यांची निवड करण्यात आली.महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शाहू विकास आघाडीच्या स्वाती मादनाईक उपसभापती पदी रूपाली बंडगर यांची तर समितीच्या सदस्य पदी मीनल नांद्रेकर, सुमय्या कडबी, उज्वला वाघवेकर, तेजश्री पाटील तर शिरोळ विकास आघाडीच्या अनिता कोळेकर यांची निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित सर्व विषय समितीच्या सभापतींचा सत्कार नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केला पीठासन अधिकारी श्रीमती टीना गवळी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.



