![]()
कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने यश मिळवले असून,आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने महायुतीला काठावरचं बहुमत गमवण्यास भाग पाडले आहे. 81 जागांपैकी काँग्रेसचे 35 उमेदवार विजयी ठरले,पाच उमेदवारांचा निसटता पराभव तर भाजपला 25, शिवसेना शिंदे गटाला 15 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या.जनसुराज पक्ष व शिवसेना ठाकरे गटाला फक्त एकच जागा जिंकता आली,तर मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिडोर्ले देखील पराभूत झाले.कोल्हापूरमध्ये महायुतीविरुद्ध काँग्रेसच्या लढतीत प्रत्यक्षपणे सतेज पाटील सामील होते.पाटील यांनी रस्त्यावर उतरून ‘कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं’ अशा शैलीत प्रचार करत महायुतीला मागे टाकले.

महायुतीच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री,प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, दोन मंत्री,आणि इतर दिग्गज नेते मैदानात उतरले,तरीही काँग्रेसने मोठे यश मिळवले.कोल्हापूर महानगरपालिका ही एकमेव महापालिका होती जिथे महायुती आधी सत्ता मिळवलेली होती,पण या निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवून महापालिकेवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. काँग्रेसने 37 जागांवर विजय मिळवून शहरात महायुतीवर निर्णायक बाजी मारली आहे.या निकालांनंतर सतेज पाटील यांचे नेतृत्व आणि सक्रिय प्रचाराचे कौतुक होत आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून,महापालिकेवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा फायदा आता शहरातील विकासकामांसाठी आणि सामाजिक प्रकल्पांसाठी वापरण्याची संधी आहे.
