लोकमंगल मल्टीस्टेटमध्ये पत्रकार दिन साजरा

लोकमंगल मल्टीस्टेटमध्ये  पत्रकार दिन साजरा

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील लोकमंगल मल्टीस्टेट को- ऑप सोसायटी लिमिटेड सोलापूर शाखा जयसिंगपूर च्या वतीने श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून जयसिंगपूर शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता चौगुले यांनी केले तसेच शाखाधिकारी गीतांजली कारंडे यांनी लोकमंगल संस्थेविषयी व व्याजदराबाबत तसेच शासकीय कर्ज योजना संदर्भात माहिती दिली.डायरी व पुष्पगुच्छ देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.यावेळी शाखा सल्लागार प्रकाश बेळगी व सरदार पाटील उपस्थित होते. आभार प्रदर्शन सुशांत कोळी यांनी केले.
सदर कार्यक्रमास जयसिंगपूर परिसरातील पत्रकार उपस्थित होते.