डॉ.जे.जे.मगदूम यांची जयंती अनिल उर्फ पिंटू मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये उत्साहात :

Loading

 सामाजिक जाणिवेतून कार्यक्रम

जयसिंगपूर: प्रतिनिधी –

डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष,शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉ.जे.जे.मगदूम यांच्या ९६ वी जयंती धरणगुत्ती ता. शिरोळ येथील डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्ट संचलित अनिलउर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेजमध्ये उत्साहात साजरी झाली. यावेळी विविध उपक्रम संपन्न झाले. तर जयसिंगपूर येथील यशवंत विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.ट्रस्ट चेअरमन डॉ.विजय मगदूम व व्हाईस चेअरमनपर्सन डॉ.सौ.सोनाली मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक जाणिवेतून सदर कार्यक्रम राबवण्यात आला.अध्यक्षस्थानी मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम होते.यावेळी भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर च्या उपप्राचार्य डॉ.मनीष भाटिया यांनी महाविद्यालयाच्या या कार्याबद्दल गौरवउद्गार काढले. प्रस्ताविक प्राचार्य डॉ.सचिन निटवे यांनी केले. तर डॉ.सचिन निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापिका मनाली भिडे यांनी सहकाऱ्यांच्या सहाय्याने कार्यक्रम यशस्वी करून आभार मानले.