श्री दत्त कारखान्यास राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार जाहीर : गणपतराव पाटील

Loading

शिरोळ : प्रतिनिधी
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील साखर कारखानदारीचे तांत्रिक गुणात्मक तुलना करून पुरस्कार जाहीर केले जातात. यावर्षी आपल्या श्री दत्त कारखान्यास कै.आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार सन 2024 25 करता व्हिएसआयच्या वतीने जाहीर केला आहे. पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह प्रशस्तीपत्र व रोख एक लाख रुपये आहे. सदर पुरस्कार सोमवार दिनांक 29 रोजी होणाऱ्या व्हीएसआयच्या वार्षिक साधारण सभेत समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

श्री दत्त कारखान्याने प्रदूषण नियंत्रणासाठी उभारलेल्या आधुनिक व अध्यायावत यंत्रणा, पाण्याचा काटकसरीने वापर,पाण्याचा पुनर्वापर,सांडपाण्याचा वापर व त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी बचत,सांडपाणी शून्य उत्सर्जनाची योग्य अंमलबजावणी,वृक्ष लागवड,माती संवर्धनासाठी प्रयत्न, कारखाना कार्यक्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर जोपासलेला हरित पट्टा, परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी केलेली विविध कामे व पर्यावरण व्यवस्थापनासाठी कुशल मनुष्यबळ इत्यादीची दखल घेऊन व्हिएसआयच्या वतीने कारखान्यास हा पुरस्कार जाहीर केला आहे यामुळे कारखान्याच्या नावलौकिकात भर पडली असून कारखान्यास मिळालेला हा 69 वा पुरस्कार आहे अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक मंडळातील सदस्य कार्यकारी संचालक एम व्ही पाटील पाटील व खाते प्रमुख उपस्थित होते