![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
सहकाररत्न शामराव पाटील यड्रावकर यांच्या जयंतीदिनी पार्वती को-ऑपरेटिव इंडस्ट्रियल इस्टेट लिमिटेड, यड्राव येथे असलेल्या त्यांच्या समाधीस्थळी अनेक मान्यवरांनी भेट देऊन अभिवादन केले.
सहकाररत्न स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रविवारी सकाळी सर्वप्रथम यड्रावकर परिवाराच्यावतीने माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन संजय पाटील यड्रावकर यांच्यासह यड्रावकर परिवारातील सदस्यांनी शामरावअण्णा यांच्या समाधीस्थळी येऊन पुष्पगुच्छ वाहून आदरांजली वाहिली. समाधीस्थळी भक्ती गीतांच्या सुश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम.पाटील, प्रकाश पाटील टाकवडेकर, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, संचालक जयपाल कुंभोजे, शरद सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन थबा कांबळे, संचालक सुभाषसिंग रजपूत, संजय बोरगावे, संजय नांदणे, अजित उपाध्ये, पोपट भोकरे, अनिल बागणे, प्रेमला मुरगुंडे, महावीर खवाटे, संचालक ताजोद्दीन तहसीलदार गुरुजी, शाबगोंडा पाटील, प्रा. अण्णासाहेब क्वाणे, बी. ए. पाटील, पै.केशव राऊत, रावसाहेब कुंभोजे, यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, सत्येंद्रसिंह नाईक निंबाळकर, डी. एन. सिदनाळे, प्रकाश अकीवाटे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, सुनील मजलेकर, राजेंद्र नांद्रेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत पाटील यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच मान्यवरांनी समाधीस्थळी भेट देऊन शामराव अण्णांच्या स्मृतीस अभिवादन केले.

