जिल्हास्तरीय यशाबद्दल कु. साईराज प्रभावळे याचे हार्दिक अभिनंदन !

Loading

कोल्हापूर : प्रतिनिधी-

जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड सन 24-25 अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर या शाळेतील विद्यार्थी कु.साईराज प्रभावळे याची निवड झाली असून त्याचे अभिनंदन होत आहे.भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
विज्ञान क्षेत्रातील अतिशय मानाच्या या स्पर्धेकरिता विज्ञान प्रमुख सौ विद्या अनिल कामत यांचे त्याला संपूर्ण मार्गदर्शन लाभले त्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख श्री श्रीराम साळुंखे मुख्याध्यापक श्री.बी.जे. सावंत यांच्याकडून यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.