![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी

केंद्रातआणि राज्यात महायुतीचे सरकार असल्या मुळे जयसिंगपूरची निवडणूक सुद्धा महायुतीसोबत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून महायुती मधील सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन लढवणार असल्याची घोषणा आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत केली.शहराचा विकास साधत असताना प्रत्येक मूलभूत गरजा पाहून शहराचा सर्वांगीण विकास साधला असून राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता नक्की येईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना “शहराचा विकास साधत असताना काही जणांनी कोणताही अभ्यासन करताना टीका केली असून १५० झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर आणि प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिले असल्याचा खुलासा त्यांनी केला.याची माहिती नगरपालिके बरोबर ऑनलाईन देखील उपलब्ध असून त्यांनी घ्यायला हवी होती पण अभ्यास करून भाष्य त्यांनी केले नाही. भुयारी गटार योजना,सुधारित पाणीपुरवठा योजना व भूमिगत गॅस पाईपलाईन या कामांमुळे रस्ते खराब झाले असून जयसिंगपूर शहरातील सर्व रस्त्यांचे प्रस्ताव तयार आहेत आणि आचारसंहिता संपल्यानंतर थेट शहरातील रस्त्यांच्या कामाला सुरुवात होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेसाठी २६ उमेदवार १ नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात आहेत.मात्र हे २७ उमेदवार महायुतीतील घटक पक्षांचे असतील असे त्यांनी स्पष्ट केले.शहराचा विकास साधायचा असेल तर आपल्या विचाराचे सरकार राज्यात आणि केंद्रात असणे गरजेचे असून तरच मोठ्या प्रमाणात निधी आणता येईल असेही ते म्हणाले.
याप्रसंगी अनिल उर्फ सावकार मादनाईक यांनी जयसिंगपूर शहरातील नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात असताना केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी महायुती मधील घटकपक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे असे सांगितले.तर भाजपाचे मिलिंद भिडे यांनी महायुतीच्या सरकारमुळे जयसिंगपूर शहराच्या विकासाला आणखीन चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष संजय पाटील यड्रावकर,असलम फरास,राजेंद्र आडके,ताराराणी आघाडीचे बजरंग खामकर,शितल गतारे,अभिजीत भांदिगिरे,मिलिंद साखरपे,शैलेश आडके,शिवसेना शिंदे गटाचे पराग पाटील,माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे,सुनील पाटील मजलेकर,युवराज शहा,भाजपाचे शहराध्यक्ष रमेश यळगुडकर,राहुल बंडगर,दादासो पाटील चिंचवाडकर,संतोष खामकर,बाळासाहेब वगरे,सागर मादनाईक यांच्यासह महायुती,सर्वघटक पक्ष ताराराणी आघाडी आणि राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.