शरद पॉलिटेक्निकची १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स स्कॉलर परिक्षा

Loading

२८ डिसेंबरला विविध केंद्रावर होणार परिक्षा

यड्राव : प्रतिनिधी

येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निककडून राज्यातील १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘‘शरद मॅथ्स स्कॉलर” परिक्षा २८ डिसेंबरला रोजी घेण्यात येणार आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना हजारो रूपयांचे बक्षिस संस्थेकडून देण्यात येणार आहे. परिक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत १० डिसेंबरपर्यंत आहे. गतवर्षी या परिक्षेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याप्रमाणे यावर्षीदेखील परिक्षा संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे.
परिक्षा इंग्रजी व मराठी अशा दोन्ही माध्यमात घेतली जाणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विविध केंद्रांवर परिक्षा होणार आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर, यड्राव, सांगली-मिरज, म्हैशाळ, कवलापूर, आरग बेडग, मांगुर (कर्नाटक सीमा भाग) आदी ठिकाणी परिक्षा होणार आहेत.
विजेत्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ३५ हजार, २५ हजार व १५ हजार रूपयांचे बक्षिस मिळणार आहे. परिक्षेसाठी १० वीच्या गणित विषयाचा अभ्यासक्रम असणार आहे. शंभर मार्काच्या या परिक्षेत ५० वस्तूनिष्ठ (Multiple Choice) प्रश्न असणार आहेत. अधिक माहितीसाठी मो.नं. ९३७०३८९५९० वर संपर्क करण्याचे आवाहन महाविद्यालयाकडून केले आहे.