![]()
बृहन्मुंबई महानगरपालिका अतंर्गत दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदी

जयसिंगपूर : प्रतिनिधी-
येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातील कु. अनिल मुडशि यांची बृहन्मुंबई महानगरपालिका अतंर्गत दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदी निवड झाली आहे. त्यांनी आज पर्यंत महाविद्यालयाचे झालेले सहकार्य, उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधा, ग्रंथालय, सिव्हिल विभाग प्रमुख व प्राध्यापकांच्या सहकार्याबद्दल महाविद्यालयाची प्रशंसा करून कृतज्ञता व्यक्त केली.
ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, व्हॉइस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे, प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड, विभाग प्रमुख डॉ. जे. एस.लंबे, डीन व प्राध्यापकांनी कु. अनिलचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.