![]()
आजरा : हसन तकीलदार-
या शहरात विविध जाती, पंथाची आणिधर्माची लोक व्यापार आणि व्यवसाय करतात. त्यामुळे सद्यस्थितीत आजरा शहरातील व्यापाऱ्यांना भेडसावत असलेले अनेक प्रश्न सोडविणे काळाची गरज बनली असून एकत्रित येऊन संघटना बळकट करण्याची गरज आहे. सर्वजण गुण्यागोविंदाने राहत असतानासुद्धा शहरावर संवेदनशील प्रदेश असा शासनाचा ठपका आहे. हा ठपका काढण्यासाठी आजरा बाजारपेठ सर्वांनी पुन्हा नावारूपाला आणली पाहिजे असा निर्धार व्यापाऱ्यांच्या स्नेह मेळाव्यात आला. श्री दुरदूंडेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये व्यापारी असोसिएशनचा स्नेह मेळावा संपन्न झाला. मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद लाभला. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे यांनी मागील काळातील लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, सुरवातीपासून मी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहे. आजपर्यँत मी प्रामाणिकपणे काम केले आहे. मला आलेल्या नोकरीचा त्याग करीत मी या व्यापारी व्यवसायात रुजलो. माझ्यावर आजपर्यँत व्यापारी बंधूनी विश्वास टाकून जबाबदारी दिली आहे ती मी प्रामाणिकपणे हाताळण्याचा प्रयत्न करीत आहे.असे ते म्हणाले.

दयानंद भोपळे म्हणाले यांनी “आपला व्यापाऱ्याचा पिंड असून तालुका डोंगराळ आहे. आणि जवळपास ८५ टक्के लोक तालुक्याच्या ठिकाणी बाजाराला येतात. यासाठी बाजारपेठ सुरळीत करण्याची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कचऱ्याची विल्हेवाट,बैठक व्यवस्था याबाबी योग्यपणे हाताळण्याची गरज आहे.” असे सांगितले.
प्रभाकर कोरे यांनी अगदी प्रभावशाली मत मांडत म्हणाले की, आजरा शहराला शासनाचा संवेदनशील हाबसलेला शिक्का व्यापारी बाजारपेठेला अडचणीचे ठरत आहे. गुण्यागोविंदाने आपापले व्यवसाय सांभाळत असताना सुद्धा हा जो शासनाचा संवेदनशिलतेचाशिक्का बसला आहे तो पुसून काढणे गरजेचे आहे. बाहेरचे व्यावसायिक येण्यासधजावत आहेत. रोजगाराच्या संधी कमी आहे. यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येणे गरजेचेआहे. असे ते म्हणाले. आजऱ्याच्या बाजारपेठेची पीछेहाट होत आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. संघटना बळकटकरून व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी दुरगामी योजना आखणे गरजेचे आहे. तालुक्याला जोठपका बसला आहे यामुळे बाहेरचे उद्योगधंदे शहरासह तालुक्यात येण्यासाठी मर्यादा येतआहेत. त्यामुळे याचा फटका रोजगारावर आणि व्यापारी वर्गास बसत आहे आणि हे सर्व प्रश्नमार्गी लावायचे असतील तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. असे ते म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. या मेळाव्यास सर्व व्यापारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर दुकाने बंद ठेऊन त्यांनी उपस्थिती लावली. मान्यवरांनी मते मांडली, पुढची दिशा काय असावी याबाबत चर्चा झाली. यावेळी जनार्दन टोपले यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी दयानंद भुसारी, बसवराज महाळंक, श्रीकांत गजरे, सचिन शिंपी, मल्लिकार्जुनतेरणी, आण्णा फडके, सुधीर देसाई, प्रकाश टोपले, नौशादभाई बुडडेखान, महेश नार्वेकर,शरीफ खेडेकर, महंतेश गुंजाटी, रवींद्र हुक्केरी, प्रशांत बिल्ले, अभिजित रांगणेकर,ओंकार माद्याळकर, राजू विभुते, संजय सावंत, मनोज गुंजाटी,अबुल काकतिकर, बाबासो खलिफ,समीर खेडेकर, बाळू पाचवडेकर, ताजुद्दीन तकीलदार, पप्पू कुलकर्णी, युसूफ मुल्ला, भास्करबुरुड, आरिफ माणगावकर तसेच सर्व व्यापारी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाय.जी. इंजल यांनी आभार मानले.
