![]()
स्वयंचलित संगणकीय लॅबोरेटरी

आजरा : प्रतिनिधी
येथील एस. टी. स्टॅंड नजिक सोनेखान कॉम्प्लेक्स आपला बझारच्या वरील मजल्यावर हेल्थकेअर क्लिनिकल लॅबचे उदघाट्न डॉ. इंद्रजित देसाई यांचे हस्ते दिमाखात झाले. संपूर्ण स्वयंचलित संगणकीय लॅबोरेटरी असून याठिकाणी रक्त, लघवी, थुंकी, थायराईड व हार्मोन्स या सर्व प्रकारच्या तपसण्या अल्पदरात करण्यात येणार येतील.
यावेळी मेडिकल असोसिएशचे अध्यक्ष डॉ. गौतम नाईक म्हणाले की, आजऱ्यात ही नवीन अत्याधुनिक लॅब आजरा वासियांच्या सेवेसाठी तत्परतेने आजपासून सेवा देणेसाठी सुरु झालेली आहे. आजऱ्यातील रुग्णासाठी चांगले काम करतील अशी अशा व्यक्त करतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. उदघाट्न प्रसंगी डॉ. इंद्रजित देसाई म्हणाले की, या लॅबमध्ये सौजन्यपूर्वक वागणूक देणार आहेत. पूर्वीपासून बुरहान खेडेकर या क्षेत्रात काम करीत आहेत त्यामुळे यांच्या कामाची आम्हाला प्रचिती आहे. योग्य आणि दर्जेदार सेवा देतील अशी आम्हांला खात्री आहे.
यावेळी डॉ. प्रवीण निंबाळकर, डॉ. निलेश भारती, युवा नेते विक्रमसिंह देसाई, डॉ. युनूस सैय्यद,जुबेर सोनेखान, नियाज हसन तकीलदार,युनूस लाडजी, जुबेर बागवान, असलम आगलावे, मजीद खेडेकर आदिजण उपस्थित होते.
