भीती नको – जिज्ञासा बाळगा : सर्प मित्र सदाशिव पाटील

भीती नको – जिज्ञासा बाळगा : सर्प मित्र सदाशिव पाटील

Loading

दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अनोखे शैक्षणिक व्याख्यान व सर्प प्रदर्शन

चंदगड : प्रतिनिधी

साप हा शब्द जरी ऐकला तरी थरकाप उडतो. परंतु “भीती नको – जिज्ञासा बाळगा!” हा संदेश घेऊन दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे “सर्प स्नेह – समज, गैरसमज आणि विज्ञान” या विषयावर अनोख्या शैक्षणिक व्याख्यान व सर्प प्रदर्शन सम्पन्न झाले. शाळेच्या परिसरात धामण जातीचा साप पकडण्यासाठी आलेले सर्प मित्र सदाशिव पाटील यांनी वरील संदेश विध्यार्थ्यांना दिला. तर साप पकडण्याचे प्रात्यक्षिक आणि त्या विषयी संपूर्ण शास्त्रीय माहिती ही त्यांनी विशद केली. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. पी. पाटील होते.

उपमुख्याध्यापक व्ही. एन. कांबळे सर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांचा सर्पांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. तर ढोलगरवाडी येथील “सर्प शाळेचे” प्रमुख व सर्पमित्र म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेले प्रा. सदाशिव पाटील प्रमुख मार्गदर्शक होते. ते पर्यावरणप्रेमी तर आहेतच आणि केंद्र शासन मान्यताप्राप्त या सर्प शाळेत आजही अनेक सापांची काळजीपूर्वक देखभाल केली जाते असे त्यांनी सांगितले.प्रा. पाटील यांनी “सर्प – समज आणि गैरसमज” या विषयावर विद्यार्थ्यांना सहज भाषेत, पण प्रभावी शैलीत मार्गदर्शन केले. सापांच्या विविध प्रजाती, त्यांचे वर्तन, उपयुक्तता, विषारी आणि बिनविषारी साप यामधील फरक, तसेच सर्पदंशानंतरचे योग्य प्रथमोपचार यांची सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. तर प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रा. पाटील यांनी संयमाने व विज्ञानाच्या आधाराने उत्तरे दिली. नागपंचमी आणि भारतीय संस्कृतीतील सापांचे स्थान, त्यामागील वैज्ञानिक आणि पर्यावरणीय समतोल याचीही माहिती त्यांनी दिली.

यावेळी व्ही के गावडे, जें जी. पाटील , वर्षा पाटील, विद्या डोंगरे, सुहास वर्पे, ओंकार पाटील विशेष करून उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले. शरद हदगल यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *