![]()
डॉ.एस.डी.पाटील यांना डॉ. एस.के.पाटील


धन्वन्तरी डॉ.जे.जे.मगदुम समाज भूषण पुरस्कार रावसाहेब उर्फ दादगौडा आपगोंडा पाटील
श्री भरत रत्न पुरस्कार प्रविण चंद्रकांत माळी गौरवमूर्ती
जयसिंगपूर : प्रतिनिधी –
येथील श्री भरत मेडिकल ट्रस्टचे सन २०२५ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यंदाचा डॉ. एस.के.पाटील धन्वंतरी पुरस्कार नांदणी ता.शिरोळ येथील डॉ.एस.डी.पाटील यांना तसेच डॉ.जे.जे. मगदुम समाज भूषण पुरस्कार कुरुंदवाड ता. शिरोळ येथील रावसाहेब उर्फ दादगौडा आपगोंडा पाटील कुरुंदवाड यांना आणि श्री भरत रत्न पुरस्कार शिरोळचे प्रविण चंद्रकांत माळी यांना जाहीर करण्यात आले आहेत. येत्या ९ ऑगस्ट रोजी कोल्हापूर सांगली महामार्गालगतच्या उदगाव ता. शिरोळ नजीकच्या कल्पवृक्ष गार्डन सभागृहामध्ये या गौरव मूर्तींना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती श्री.भरत बँकेचे विद्यमान चेअरमन डॉ श्रीवर्धन एस. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सालाबादप्रमाणे श्री.भरत बँक व श्री.भरत मेडिकल ट्रस्ट यांच्या वतीने नगरीचे प्रसिध्द धन्वंतरी तथा जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष श्री.भरत बँक व भरत मेडिकल ट्रस्टचे संस्थापक स्वर्गीय डॉ.एस. के.पाटील यांच्या स्मृतीनिमित्त हा सोहळा होत आहे.
डॉ.एस.डी.पाटील हे सामाजिक बांधिलकी जोपासून समाजाची वैद्यकीय सेवा बजावत आहेत त्यांना डॉ.एस.के. पाटील धन्वतंरी पुरस्काराने आणि तसेच स्वर्गीय डॉ.जे. जे.मगदूम यांचे स्मृतीनिमित्त दिला जाणारा डॉ.जे.जे.मगदूम समाज भूषण पुरस्कार” बँकेचे संस्थापक संचालक राष्ट्रसेवा दलाचे जेष्ठ नेते कुरूंदवाड नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष व सानेगुरुजी शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि सन २०२५ वा कुरूंदवाड भूषण पुरस्कार विजेते रावसाहेब उर्फ दादगोंडा आपगोंडा पाटील याना तर बँकेच्या कार्यक्षेत्रातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीस देणेत येणारा “श्री भरतरत्न पुरस्कार” शिरोळ गावाचे उच्च विद्या विभूषित शेतीतज्ञ व व्याख्याते प्रविण चंद्रकांत माळी यांना देण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व लोकप्रिय माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आणि वडगांव मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्पवृक्ष गार्डन जयसिंगपूर-सांगली रोड जयसिंगपूर येथे शनिवार दिनांक ०९ ऑगस्ट रोजी श्री भरत बँकेच्या ५५ व्या वार्षिक सभेत सकाळी १० वाजता संपन्न होत आहे.
श्री भरत बँकेचे विद्यमान चेअरमन श्रीवर्धन एस. पाटील व्हा.चेअरमन अजित दा.पाटील, संचालक,पै.विठ्ठल बाबूराव मोरे,अशोकराव रुणवाल,प्रसन्न कुंभोजकर डॉ.किरण आणुजे तसेच पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. महावीर अक्कोळे,डॉ.ए.एम. खटावकर,डॉ.अतिक पटेल,डॉ विजय कुरडे,डॉ. अनिल पाटील आणि डॉ. धवल कुमार पाटील आदींनी या निवडी केल्या आहेत.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजंनी वसविलेल्या जयसिंगपूर नगरीत १ मार्च १९७१ रोजी डॉ.एस के. पाटील,डॉ.जे.जे.मगदूम, धनपालआण्णा झेले व त्यांच्या सर्व सहकारी संचालक सदस्यांनी सर्व साम्राज्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी श्री भरत बँकेची स्थापना केली. अल्पावधीतच नावारुपास आलेली आपली बैंक “भरत बँक ” बँकेच्या दि. ३१ मार्च २०२५ रोजीच्या ठेवी २७९ कोटी ८१ लाख ८७ हजार असून कर्जे रु. १६० कोटी १ लाख १४ हजार आहेत. बँकेचा सीआर एआर १२.३८ टक्के तसेच निव्वळ नफा रु. १ कोटी ३० लाख ५६ हजार असून बँकेस सतत ऑडिट अ वर्ग मिळाला आहे.
बँकेच्या शाखा जयसिंगपुर, नृसिंहवाडी, नांदणी, शिरोळ येथे एटीएम सेवा सुरु असून ई-कॉम, सीटीएस क्लिअरिंग, इसीएस डेबिट-क्रेडिट बँकिंग, मोबाईल बँकिंग व यूपीआय सुविधा आणि आधार लिंक, शासकिय सबसिडी तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, स्व.वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्या मार्फत दिली जाणारी कर्ज योजना बँकेने सुरु आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चालू असून आरटीजीएस सेवा व एनईएफटी सेवा बँकेमार्फत दिली जाते.
बँकेची ५५ वी वार्षीक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक ०९/०८/२०२५ रोजी होत असून या सभेत श्री भरतरत्न श्री.भरत बँक संचलित भरत मेडिकल ट्रस्ट चे माध्यमातून “धन्वंतरी पुरस्कार” व “समाजभूषण पुरस्काराचे वितरण होणार आहे. श्री भरत बँकेच्या सभासदांनी एकदाच रु. ५१०/- सभासद वर्गणी भरुन भरत मेडिकल ट्रस्टमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सोई सवलती व आर्थिक मदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन भरत मेडिकल ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ.श्रीवर्धन पाटील, खजिनदार पै.विठ्ठल मोरे, सेकेटरी प्रसन्न कुंभोजकर यांनी केले.

