पहिली शाळा म्हणजे आपले घरच असते : चारित्र्यवान विद्यार्थी घडवते तेच खरे शिक्षण

Loading

प्राचार्य एस.पी पाटील यांचा मौलिक संदेश 

चंदगड : प्रतिनिधी

“शाळा ही विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू असली, तरी पहिली शाळा म्हणजे आपले घरच असते. शाळेत शिक्षक केवळ ६ तास शिकवतात, पण उर्वरित वेळ पालकांनी संवादातून, सहभागातून आणिसहकार्यातून विद्यार्थ्याला अधिक सक्षम करणे गरजेचे असून चारित्र्यवान विद्यार्थी घडवणारे शिक्षण हेच खरे शिक्षण आहे. अस मौलिक संदेश बी.सी.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य एस.पी.पाटील यांनी दिला. येथील दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकमेळाव्यात ते  बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.एस.चौगुले होते.
उपमुख्याध्यापक व्ही.एन. कांबळे यांनी “विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या सवयी, नियोजनशक्ती आणि भावनिक समज विकसित होण्यासाठी शिक्षकासोबतच पालकांचेही मार्गदर्शन महत्त्वाचे असते.” असे सांगितले. तर “शिष्यवृत्ती परीक्षा ही फक्त आर्थिक लाभासाठी नसून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा कस पाहणारी संधी आहे. इयत्ता पाचवीत चांगली कामगिरी करणारा विद्यार्थी एनएमएमएस,एन टीएसई व स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चित उजळून निघतो.” असा आत्मविश्वास यावेळी बोलताना शिष्यवृत्ती मार्गदर्शिका वर्षा पाटील म्हणाल्या. स्वागत मुख्याध्यापक आर.पी. पाटील यांनी केले. यावेळी पालकांशी अभ्यासक्रम, सरावपत्रिका, मासिक चाचण्या, गट चर्चा, शंका निरसन, मोबाईलवापरावर नियंत्रण, टीव्हीच्या मर्यादा, घरच्या अभ्यासाचे नियोजन यासंबंधी सविस्तर चर्चाझाली. यावेळी जान्हवी पाटील, कविता काजिर्णेकर, मच्छिंद्र पाटील, किशोर गावडे, शरदहदगल, ओंकार पाटील, प्रियाराणी बुरुड, साधना भोसले, नामदेव गोंधळी आदी मान्यवर, पालकआणि शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन व्ही.के. गावडे यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *