शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या २७ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपनीमध्ये निवड

Loading

यड्राव : प्रतिनिधी- 

येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या२७ विद्यार्थ्यांची शक्ती ऑटो कंपोनंटस लि. या नामांकित कंपनीत निवड झाली असून महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल विभागातील हे यशवंत विध्यार्थी आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर विभागातील अशिष कोथळे, ओंकार कांबळे, श्रेयस पाटील,साहिल मेंडगुले, अनिकेत देशमुख, ऋतुराज पाटील, ऋषीकेश शिंदे, रोहित माळी, श्रीजीत नाडगौडा,शंतनु जोशी, मोहक सिदगौडा, मेकॅट्रॉनिक्स- शुभम कांबळे, राझेन मोमिन, संकेत गोरे, मयुरपाटील, साहिल पठाण, सोहम चव्हाण, मंदार डोंगरे, चिन्मय कोरे, अदित्य बरगाले, सुजल कुरडे,इलेक्ट्रीकल- अशिष रुकडे, अविष्कार तुरंबेकर, अथर्व पाटील, नौमन मुजावर, तर मेकॅनिकल -साहिल चौगुले, अजय सिंग यांची निवड झाली. 
शक्ती ग्रुपचा एक भाग असलेली शक्ती ऑटो कंपोनंट लिमिटेड ही एक सुस्थापित ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादक कंपनी आहे ज्याची भारतात आणि जगभरात लक्षणीय उपस्थिती आहे. कंपनीकडे१००० हून अधिक कर्मचारी आहेत. कंपनी लोह/अल्युमिनियम कास्टिंग, मशीन केलेले कंपोनंटआणि असेंबल केलेले पार्ट्स यासह विविध ऑटोमोटिव्ह कंपोनंटच्या डिझाइन, विकास आणि उत्पादन करते. कंपनीचे कोईम्बतूर (तामिळनाडू) येथे मुख्यालय आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निग अंतर्गत सुरू असलेल्या ऍक्टिव्हिटी स्लॉटमध्ये मुलांच्याकडून ग्रुप डिसक्शन, इंटरव्ह्यु टेक्नीक्सचा सराव करून घेण्यातआला आहे. तसेच जर्मन, पायथॉन, सी अशा विविध भाषांचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी झाला.

संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर,एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी यशवंतांचे अभिनंदन केले. तर ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसेलचे डिन प्रा. ए.बी.जाधव, प्रा.नेहा प्रसून, प्रा. विद्या पाटील यांच्यासह सर्वडिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य यशवंताना लाभले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *