” इंक अँड इनसाईट लिटरेचर फेस्ट 2025″ मोठ्या उत्साहात : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

” इंक अँड इनसाईट लिटरेचर फेस्ट 2025″ मोठ्या उत्साहात : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

Loading

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणारा एक बहुभाषिक साहित्य मेळा : नीलम माणगावे

अतिग्रे : प्रतिनिधी-

येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई डे बोर्डिंग विभागात ” इंक अँड इनसाईट लिटरेचर फेस्ट 2025″ नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. पाच भाषांतील (मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी व फ्रेंच) गीत, ज्यात भाषिक आणि सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन हे प्रमुख आकर्षण ठरले. हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणारा एक बहुभाषिक साहित्य मेळा असल्याचे बालसाहित्यिक नीलम माणगावे म्हणाल्या. यावेळी लेखिका डॉ. राजश्री राजगोंडा पाटील उपस्थित होत्या. हिंदी विभागाच्या विद्यार्थांनी कवी संमेलनातून नऊ रसांवर आधारित कविता सादर केल्या. नंतर इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली विनोदी कविता आणि “कॅरेक्टर परेड” यांनी सर्वांची मने जिंकली. तर लेखिका राजश्री राजगोंडा पाटील व लेखिका निलम माणगावे यांच्या प्रेरणादायी भाषणांनी विद्यार्थ्यांना वाचन व लेखनाची प्रेरणा दिली.

मराठी विभागाच्या नटसम्राट या नाटकाने उपस्थितांचे डोळे पाणावले. पालक व मुलांमध्ये नात्यांचे बारकावे, वृद्धापकाळातील दुर्लक्षिततेचे वास्तव नाटकातून मांडले. यानंतर कथाकथन सत्र रंगले. कन्नड विभागाने भावनात्मक कविता सादर झाल्याने प्रादेशिक रंग भरला. तर शाळेतील २८ नवोदित बाल लेखकांचा गौरव करण्यात आला. “शब्दधारा” ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे साहित्यिक लेखन आणि सर्जनशीलता अंतर्भूत आहे अशा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सर्व शिक्षक, विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमामुळे लिटरेचर फेस्टिवल उत्कृष्ट झाल्याचे कौतुकाचे शब्द प्राचार्य अस्कर अली यांनी व्यक्त केले. लिटरेचर फेस्टिवलमध्ये सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. यावेळी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य श्री. अस्कर अली उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *