दौलत अथर्व थकीत एफ आर पी वर्ग करणार

Loading

अफवांवर विश्वास ठेवू नका : कारखाना प्रशासनाचे प्रसिद्धी पत्रक

चंदगड: प्रतिनिधी

दौलत (अथर्व) ची २०१०-११ थकीत एफआरपी लवकरच वर्ग करू, आफवांवर विश्वास ठेवू नये असे प्रसिद्धी पत्रक कारखाना प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले असून एफ आर पी देण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती सुद्धा सभासदांपर्यंत पोहोचत आहे. याबाबत तालुक्यातील गावनिहाय कागदपत्रांची पडताळणी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार सुरू असून यासंदर्भात कुणीही गैरसमज पसरवू नये असे आवाहन दौलत (अथर्व) कारखाना प्रशासनाच्या वतीने प्रसिध्दीपत्रकातून करण्यात आले आहे.

याबाबत उपजिल्हाधिकारी (महसूल) यांचे कार्यालयात मंगळवारी (दि. 08 जुलै 2025 रोजी) बैठक झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर विभाग यांच्या कार्यालयात बुधवारी (दि. 16 जुलै 2025 रोजी) आयोजित बैठकीत देखील कंपनीने कारखाना २०१० ते १०१९ या कालावधीत बंद अवस्थेत होता. त्यामुळे कागदपत्रे तथा वारस पडताळणी करणे आवश्यक असून त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली. त्याअनुषंगाने या प्रकरणाबाबत प्रादेशिक सहसंचालक कार्यालय (साखर), कोल्हापूर या ठिकाणी ही प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या निर्देशानुसार कारखाना प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या छायांकित प्रतीनुसार गावनिहाय नियोजन केले असून त्याबाबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना ऊस पुरवठादारांना शेती विभागामार्फत दिल्या आहेत. आतापर्यंत २ हजार ७०० ऊस पुरवठादार यांची पडताळणी झाली असून यामध्ये काही ऊस पुरवठादार सध्या हयात नसल्याने, वारस पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी शेती विभागामार्फत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करून ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. तसेच ज्या ऊस पुरवठादारांची पडताळणी पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांची २०१०-११ मधील थकीत एफआरपी वर्ग करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे सीईओ विजय मराठे यांनी सांगितले. तरी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील कारखाना प्रशासनामार्फत त्यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *