होमिओपॅथीक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करून घ्यावे  

Loading

होमिओपॅथीक डॉक्टर संघटनेची मागणी 

आजरा / प्रतिनिधी
आजऱ्यातील होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन ही तालुक्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांची संघटना आहे. इतर कोणत्याही दबावाला अथवा कोणत्याही संघटनांच्या अफवाना बळी न पडता होमिओपॅथीक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करून घ्यावे अशा मागणीचे निवेदन होमिओपॅथीक डॉक्टर संघटनेने आजरा तहसीलदारांना दिले आहे. आय.एम.ए.संघटनेचे पदाधिकारी एक वर्षाचा सी. सी. एम. पी. कोर्स पास झालेल्या होमिओपॅथीक डॉक्टरांची बदनामी करणारी व दिशाभूल करणारी खोटी माहिती प्रसारित करून जनतेची, त्यांच्या सदस्यांची व सरकारचीही दिशाभूल करीत आहेत. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. महाराष्ट्रातील जनतेला चांगली वैद्यकीय सेवा वेळेत उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने एम. बी. बी. एस. डॉक्टर्स जेथे पोहचू शकत नाहीत किंवा जाऊ इच्छित नाहीत. अशा भागातील रुग्णांना चांगली आणि वेळेत सेवा मिळावी याच उदात्त उद्देशाने विविध संघटना व संस्थानी केलेल्या मागणीनुसार विविध शासकीय कमीट्या तयार करून व त्याचा सर्वांग सखोल अभ्यास करून शासकीय समित्यांच्या शिफारशी प्रमाणे विधिमंडळात विधेयक सादर करून एम. एम. सी. ऍक्ट १९६५ व एम. सी. एच. ऍक्ट 1960 मध्ये बदल मंजूर करून 1 जुलै 2014 रोजी  राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीने कायद्यात बदल मंजूर करण्यात आले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार विविध पातळीवर सखोल संशोधन व अभ्यास करून होमिओपॅथीक डॉक्टर्सना मॉडर्न मेडिसिनचा उपचार करण्यासाठी सक्षम वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी एक वर्षाचा सर्टिफिकेट इन मॉडर्न फार्मोकोलोजी हा अभ्यासक्रम तयार करून जेथे फक्त एम. बी. बी. एस. विद्यार्थ्यांचे शिक्षण दिले जाते त्याच वैद्यकीय महाविद्यालयात होमिओपॅथी डॉक्टरांना प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. 
फार्मोकोलोजी बरोबरच इतर विषयाचे प्रशिक्षण देऊन त्याची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्यांना कायद्याप्रमाणे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये वेगळ्या परिशिष्ट मध्ये नोंदणीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने कायद्यातील तरतुदी प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी दि. 30 जून 2025 रोजी आदेश निर्गमित केला आहे. हा निर्णय सर्वस्वी महाराष्ट्रातील जनतेला दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठीच घेतला आहे. काही संघटना कोणताही अभ्यास न करता असत्य व अर्धसत्य माहितीद्वारे दिशाभूल करत रुग्णांना वेठीस धरणाऱ्या आंदोलनाची भाषा करीत आहेत,  शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारचे अनेक आरोप या निवेदनात करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या दबावाला बळी न पडता कायद्यातील  तरतुदी प्रमाणे 9 हजारपेक्षा जास्त सी. सी. एम. पी. पास डॉक्टर्सना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (एम. एम. सि.)नोंदणी प्रक्रिया राबविण्याबाबत विनंती करीत आजरा तहसीलदारांना होमिओपॅथी डॉक्टर संघटनेने निवेदन दिले. 
यावेळी डॉ. सुहास गुरव (अध्यक्ष ), डॉ. सागर पारपोलकर (उपाध्यक्ष ), डॉ. गौरी भोसले (सेक्रेटरी ), डॉ. अमित बेळगुंदकर (खजिनदार ), डॉ. रोहन जाधव, डॉ. अभिजित दड्डीकर, डॉ. बी. जी. पाटील, डॉ. दीपक हरमळकर, डॉ. प्रवीण निंबाळकर, डॉ. सागर तेउरवाडकर, डॉ. हेमंत भोसले, डॉ. सुरजीत मोटे, डॉ. भरत मोहिते, डॉ. अमित घुगरे, डॉ. सुहास देसाई, डॉ. स्मिता कुंभार, डॉ. हेमंत भोसले, डॉ. अनिल पाटील, डॉ. आरती बेळगुंदकर, डॉ. सुनीता पारपोलकर, डॉ. गॉडद आदिजण उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *