जीव घेण्या प्रवासापासून लोकांना मुक्त करा ; चंदगड फाटा ते आंबोली खड्ड्याचे साम्राज्य

Loading

चंदगड : तातोबा गावडा
चंदगड फाटा ते आंबोली पर्यंत खड्ड्याचे साम्राज्य होऊन मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अपघात होत आहेत. आंबोली पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने टू व्हीलर फोर व्हीलर खड्डा चुकवण्याच्या नादात अपघात होत आहेत. आज कानुर बुद्रुक येथे खड्डा चुकवत असताना एक फोर व्हीलर 15 ते 20 फूट शेतामध्ये घुसली, कोणतीही जीवित हानी झाली नाही. अशा रोजच्या घटनांना सार्वजनिक बांधकाम विभाग आळा घालेल काय? असा सवाल उपस्थित होत आहे. आपली जबाबदारी पूर्ण करेल काय? लाखो रुपयांचे कंत्राट वर्षाला काढूनही जर खड्डे मुक्त रस्ते होत नसतील तर कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड नेमकी कोणती भूमिका बजावत आहे? धामापूरचे सरपंच संतोष मोरे कानूर बुद्रुक चा महिला तेथील जस्ट युवक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी मांडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ जीव घेण्या प्रवासातुन लोकांना मुक्त करावे अशी मागणी होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *