जैनापूर शरद कृषिमध्ये ऑनलाइन फॉर्म भरण्याची निशुल्क सुविधा : प्राचार्य डॉ.कोळी

Loading

जैनापूर : प्रतिनिधी

येथील शरद कृषि महाविद्यालय येथे अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठीचा ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा सुरु असून गुरुवार (ता. १७) पर्यत ऑनलाईन अर्ज करणे आणि आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार आहेत. सदर प्रवेशाची सखोल माहिती व ऑनलाइन फॉर्म भरण्याची नि:शुल्क सुविधा शरद कृषि महाविद्यालयमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा व अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधाण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. सारिका कोळी यांनी केले. कृषि व कृषि संलग्न अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत MHT-CET व इतर प्रवेश पात्रता परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यानुसार सीईटी सेलकडून कृषि व कृषि संलग्न अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सदर प्रवेशाची माहिती पुस्तिका व ऑनलाईन अर्ज, https://cetcell.mahacet.org, www.mcaer.org व www.ugagriadmission.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे त्या म्हणाल्या.

विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, विद्यार्थ्यांना व पालकांना याबाबत सविस्तर व योग्य मार्गदर्शन व्हावे व प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी शरद कृषि महाविद्यालय या ठिकाणी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या सूचनेनुसार प्रवेशपूर्व मार्गदर्शन व ऑनलाइन फॉर्म भरण्याची नि:शुल्क सुविधा सुरू करण्यात आली आहे. कृषि पदवीधरांना शासकीय, निमशासकीय व खाजगी कंपन्यांमध्ये सेवेच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत, त्या दृष्टीने कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोयीसाठी महाविद्यालयात प्रवेशपूर्व सल्ला व मार्गदर्शन सुविधा सुरू आहे. मुलींना मोफत शैक्षणिक फी, सर्व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. त्यासोबत मुला – मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उपलब्ध आहे. बी. एस्सी. (कृषि) साठी प्रवेश घेण्यासंबंधी माहिती व मार्गदर्शन तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कॅम्पसला भेट द्यावी असे आवाहन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *