गोकुळच्या वतीने मोफत सुगंधी दूधआणि हरीपाठ पुस्तिकांचे वाटप

Loading

जपली सामाजिक बांधिलकी

कोल्हापूर: प्रतिनिधी-

आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोल्हापूरते प्रति पंढरपूर (नंदवाळ) ता.करवीर या मार्गावर दरवर्षीप्रमाणे काढण्यात आलेली पारंपरिक पायी दिंडी भक्तिभावाने पार पडली. हजारो वारकरी, टाळ-मृदंगाच्या गजरात सहभागी झाले असून, या भक्तिमय वातावरणात गोकुळ दूध संघाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत सुगंधी दूधआणि हरीपाठ पुस्तिकांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली. या पायी दिंडीचे औचित्य साधून दिंडीतील भाविकांना गोकुळच्या वतीने ५ हजार सार्थ हरिपाठ पुस्तिका तसेच सुगंधी दूधाचे वाटप गोकुळचे चेअरमननविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.  नंदवाळ दिंडीत दरवर्षी हजारो वारकरी सहभाग घेतात. गोकुळतर्फे आम्ही त्यांच्यासाठीदिलेले दूध आणि हरीपाठ हे केवळ सेवा नव्हे, तर आमचं भक्तीभावातून केलेलं योगदान आहे.शेतकरी हे गोकुळचे आधारस्तंभ आहेत. त्यांचं हित आणि समाजाची सेवा हेच गोकुळचं खऱ्या अर्थाने काम आहे. असे  या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, यावेळी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्‍वासपाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, संभाजी पाटील, प्रकाश पाटील,बयाजीशेळके, संचालिका शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, लक्ष्मण धनवडे, उल्हासपाटील, महिला नेतृत्व अधिकारी मृण्मयी सातवेकर, संपदा थोरात, संघाचे अधिकारी कर्मचारीव महिला स्वयंसेविका आदि उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *