![]()
आजरा येथे 3 किलो प्लास्टिक जप्त; 5800 दंड वसूल

आजरा : हसन तकीलदार
महाराष्ट्र राज्य शासनाच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील क्षेत्रीय कार्यालयासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा राबविण्याचे निर्देश दिल्याप्रमाणे दि. 1 मे 2025 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत आजरा नगरपंचायत मार्फत “मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान” या नावाने कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये कचरा ठिकाणाचे सुशोभीकरण करणे, प्लास्टिक बंदी व त्याबाबत जनजागृती करणे, सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणे,सी. सी. टी. व्ही कॅमेरे बसविणे, विरंगुळा केंद्राची स्थापना करणे इत्यादी कार्यक्रम राबविणेत येणार असून या अभियांनांतर्गत आज आजरा बाजारपेठेतून शहरामधील व्यावसायिक आस्थापनाची तपासणी करण्यात आली आणि प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करून प्लास्टिक वापरावर धडक कारवाई करीत प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत 3 किलो प्लास्टिक जप्त केले असून 5800/₹इतका दंडही वसूल करण्यात आला असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक अमर कांबळे यांनी दिली. आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक अमर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले. या अभियानामध्ये वरिष्ठ लिपिक संजय यादव, अरुण कांबळे, कोमल देसाई, अजिंक्य बागल, अनिकेत पाटील, रमेश कांबळे, जयवंत कांबळे, गणेश राम यांनी सहभाग नोंदवला.
