![]()
आजरा तालुका प्रतिनिधी – राजाराम कांबळे


16 जून शाळा प्रवेशोत्सव दिनानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आजरा व कोल्हापूर मधील सर्वात दूर व दुर्गम अतिपावसाच्या ठिकाणी असलेल्या धनगरवाडा, किटवडे शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर स्वागत करून शुभेच्छा दिल्या.ठीक सकाळी साडेनऊ वाजता संबंधित शाळेत भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांना पुस्तके गणवेश ,खाऊ वाटप व व इतर साहित्य वाटप करण्यात आले
यावेळी शाळेचे शिक्षक कोकितकर यांनी शाळेबद्दल ची माहिती देऊन मुलांचे गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न याबद्दल सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी कोकितकर वर्षापासून सदर दुर्गम शाळेत काम करत असून मुलांची गुणवत्ता व अभ्यास याबद्दल चांगले प्रयत्न केल्यामुळे त्यांचे कौतुक केले. त्यानंतर तिथे ग्रामस्थांची संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून सांगितल्या व प्रशासनाला याबाबत सूचना देण्यात आल्या.
त्यानंतर घाटकरवाडी येथील तलावात पर्यटन पर्यटन संबंधित काय उपाययोजना करण्यात येतील यासाठी भेट दिली. तसेच दाभिल येथील घनसाळ तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांची भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.
तसेच घनसाळ तांदळाचे ब्रॅण्डिंग करणे तसेच त्यामध्ये भेसळ होणार नाही यासाठी कसे प्रयत्न करता येईल याबाबत तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. तहसील कार्यालयात सर्व विभागाचे अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधून नैसर्गिक आपत्ती मधील उपाय योजना तसेच विविध प्रशासकीय कामे याबाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, प्रांताधिकारी हरेश सुळ, तहसीलदार समीर माने,गटविकास अधिकारी संजय धमाळ, गट शिक्षण अधिकारी गुरव, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई व महसूल अधिकारी, तलाठी कर्मचारी उपस्थित होते..
