संजय घोडावत संजय घोडावत विद्यापीठाचा विद्यार्थ्याने गाठले यशाचे शिखर

Loading

फ्री स्टाइल फुटबॉल कलेत चौथ्यांदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

अतिग्रे : प्रतिनिधी

येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थी खेळाडूने चौथ्यांदा यशाच्या शिखराला गवसणी घातली असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये त्याची नोंद झाली आहे. फ्रीस्टाइल फुटबॉल या कलेत सातत्याने नवे शिखर गाठणारा संजय घोडावत विद्यापीठाचा विद्यार्थी प्रणव अशोक भोपळे याने आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर ‘ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये चौथ्यांदा आपले नाव नोंदवले. या वेळी प्रणवने “मोस्ट फुटबॉल सॉसर बॉल हेड स्टॉल टु नोस स्टॉल ट्रानसिशन इन 30 सेकंदस” या प्रकारात अवघ्या ३० सेकंदांत ५६ वेळा फुटबॉल कपाळावरून नाकावर फिरवून एक अद्वितीय विक्रम प्रस्थापित केला. याची अधिकृत नोंद ‘ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली.

या विक्रमी कामगिरीचे प्रात्यक्षिक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी केले होते. त्यावेळी उपस्थित साक्षीदारांनी त्याच्या कौशल्याचे प्रामाणिकपणे निरीक्षण केले. या विक्रमी यशामध्ये संजय घोडावत शिक्षण समूहाचे अध्यक्ष श्री. संजय घोडावत, विश्वस्त श्री. विनायक भोसले, श्री सोहन तिवडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तर प्रात्यक्षिकवेळी साक्षीदार म्हणून स्पोर्ट्स ऑफिसर सूर्यजीत घोरपडे, फुटबॉल कोच अरुण पाटील, भरत पाटील, अमित कोडक, उमेश घोडके, श्रेयस रजपूत, पंकज तोरसे हे सर्व क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते.

प्रणवच्या यशामध्ये त्याचे आई-वडील व मोठा भाऊ यांचेही खूप मोठे योगदान असून, त्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले आहे. त्याचे या आधीचे तीन विक्रमही थक्क करणारे आहेत. या आधी प्रणवने तीन ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्ड करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. चौथ्या विक्रमासह तो देशातील आघाडीच्या फ्रीस्टाइल फुटबॉल खेळाडूंमध्ये गणला जात आहे.
प्रणव अशोक भोपळे याच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *