उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांची अभिनंदनीय निवड

उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांची अभिनंदनीय निवड

Loading

कोल्हापूर : प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या STARS (Strengthening Teaching-Learning and Results for States) या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत मराठी (प्रथम भाषा) विषयातील पायाभूत चाचणी निर्मितीसाठी चंदगड तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांची निवड करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांची निवड करून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी योगदान देण्याची संधी मिळवणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे. संजय साबळे यांनी मराठी भाषेच्या अध्यापनात नवनवीन प्रयोग व विद्यार्थी भिमुख उपक्रम राबवले आहेत. याची दखल घेत त्यांची निवड राज्यस्तरीय टीममध्ये झाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य आर. पी. पाटील व शालेय समितीचे चेअरमन एन. एस. पाटील यांनी श्री. साबळे यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संजय साबळे यांची निवड ही चंदगड तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब असून, त्यांच्या कार्यातून जिल्ह्यातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी आदर्श आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *