सख्ख्या भावाने दिली खुनाची सुपारी

सख्ख्या भावाने दिली खुनाची सुपारी

Loading

खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा 

जयसिंगपूर : प्रतिनिधी-

तमदलगे, ता. शिरोळ या गावात बसवान खिंड येथे निर्जन डोंगरामध्ये घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. मयताच्या सख्या भावानेच ६,००,०००/- रूपयाची सुपारी देवून खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस येत असून या प्रकरणी ६ आरोपीना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर व जयसिंगपूर पोलीस ठाणे यांची ही कामगिरी कौतुकाचा आणि अभिनंदनाचा विषय बनली आहे.

दिनांक २७/०५/२०२५ रोजी सकाळी ०७.४५ वाजणेच्या पुर्वी बसवान खिंडीत डोंगरात तमदलगे गावचे हद्दीत गावठाण जमिन गट नं. २८ जाणारे रोडचे बाजूस मयत अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अज्ञात शस्त्राने खुन केलेला होता. त्याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाणे गु.र.नं. २४६ / २०२५ भारतीय न्याय संहीता. कलम १०३(१) कलमान्वये अज्ञात इसमाचे विरूध्द खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता यांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीना तात्काळ अटक करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील एकुण ३ पथके सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहीती घेण्यासाठी नेमण्यात आली. तसेच सदर तपासकामी जयसिंगपूर पोलीस स्टेशनकडील २ पोलीस पथके अशी एकुण ५ पथके नेमण्यात आली होती.

सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा व जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील तपास पथकास चौकशी दरम्यान मयताचा भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील याचेवर संशय आलेने त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने सख्खा भाऊ अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील हा दररोज दारु पिवुन घरी भांडण करुन त्याच्या मुलांना पत्नीला मारहाण करीत असलेने त्याचे या कृत्याला कंटाळुन त्याने आपला मित्र मोहन प्रकाश पाटील यास भाऊ अविनाश हा घरी खुप त्रास देत असलेने त्याचा काटा काढणेचा आहे, असे सांगितले. त्यानंतर मित्र मोहन प्रकाश पाटील याने त्याचे ओळखीचे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात,रा. धनगर वाडा, कुंभोज रोड, दानोळी यास बोलावुन घेवुन अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील याला ठार मारणेचे आहे, असे सांगीतले. त्यावर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात याने अविनाश उर्फ दिपक पाटील यास मारणेसाठी ६ लाख रुपये देण्यास सांगीतले. यावर जिनगोंडा ओमगोंडा पाटील याने भाऊ अविनाश उर्फ दिपक पाटील यास ठार मारायच्या आधी ३ लाख व मारलेनंतर ३ लाख रुपये देण्याचे कबुल केले.

जिनगोंडा ओमगोंडा पाटील याने ठरल्याप्रमाणे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात रा. धनगर वाडा, कुंभोज रोड, दानोळी यास मोहन प्रकाश पाटील याचे मध्यस्थीने ३ लाख रुपये रोख रक्कम दिली. त्यानंतर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात याने अविनाश उर्फ दिपक पाटील यास ठार मारणेकरीता त्यांचे सहकारी मित्र १. किरण आमान्ना थोरात, रा. नवीन पाण्याची टाकी, धनगर वाडा, दानोळी ता. शिरोळ २. सागर भिमराव लोहार रा. दिलदार चौक, भादोले, ता. हातकणंगले व ३. अमर रामदास वडर रा. दिलदार चौक, भादोले, ता. हातकणंगले याना सोबत घेवुन मयत अविनाश उर्फ दिपक पाटील याचेवर तो घरातुन किती वाजता बाहेर पडतो व दिवसभर कोठे कोठे जातो यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर वरील सर्व नमुद आरोपींनी संगनमत करुन दिनांक २६/०५/२०२५ रोजी अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील याचेवर पाळत ठेवुन व योग्य संधी पाहून रात्री तमदलगे गावचे हद्दीत बसवान खिंडीत असले निर्जन डोंगरात नेवुन अविनाश उर्फ दिपक पाटील याचे डोक्यात दगड घालुन निघृण खून केल्याची कबुली दिली.त्यानंतर जयसिंगपुर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापुर यांनी समांतर तपास यंत्रणा राबवुन वरील नमुद आरोपींना निमशिरगाव, दानोळी व भादोले ता. हातकणंगले येथुन शिताफीने ताब्यात घेवून त्यांच्याकडे खुनाच्या गुन्हा अनुषंगाने तपास केला असता वरील आरोपींनी अविनाश उर्फ दिपक पाटील रा. निमशिरगाव ता. शिरोळ यांच्या खुन केल्याची कबुली दिलेने सदर आरोपींना गंभीर गुन्हयाच्या तपास कामी जयसिंगपुर पोलीस ठाणेस हजर करणेत आले आहे. तरी जयसिंगपुर पोलीस ठाणे तपास पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग कोल्हापुर मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गंभीर असा खुनाचा गुन्हा अत्यंत जलदगतीने कौशल्यपुर्ण तपास करुन उघड करुन गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे १) जिनगोंडा ओमगोंडा पाटील, वय ३७ वर्ष, रा. सांगली बायपास रोड, गौंडाप्पा मळा, निमशिरगाव, ता.शिरोळ, २)मोहन प्रकाश पाटील, वय ३३ वर्ष, रा. सांगली बायपास रोड, नायरा पेट्रोल पंप जवळ, निमशिरगाव, ३) राकेश उर्फ विनोद वसंत थोरात वय २३ वर्ष, रा.धनगर वाडा, कुंभोज रोड, दानोळी, ४) किरण आमान्ना थोरात वय २७ वर्ष, रा. नवीन पाण्याची टाकी, धनगर वाडा, दानोळी, ५) सागर भिमराव लोहार, वय ३० वर्ष, रा. दिलदार चौक, भादोले, ता. हातकणंगले, ६)अमर रामदास वडर, वय ३३ वर्ष, रा. दिलदार चौक, भादोले, ता. हातकणंगले यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन जयसिंगपूर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी रोहीणी सोळंखे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर स्था. गु. अ. शाखा, कोल्हापूर, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, सहायक पोलीस निरीक्षक दिपक कदम, पोसई प्रवीण माने, पोसई युनुस इनामदार, स्था. गु. शा कोल्हापुर कडील पोसई शेष मोरे, पोसई जालिंदर जाधव, पोसई राजीव शिंदे जयसिंगपूर पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार सहा. फौजदार विजय गुरखे,निलेश मांजरे,ताहीर मुल्ला, वैभव सुर्यवंशी, बाळासाहेब गुत्ते कोळी, स्था. गु.अ.शाखा, कोल्हापुर यांचेकडील पोलीस अंमलदार नामदेव यादव, संजय कुंभार, महेश पाटील, नवनाथ कदम,दिपक घोरपडे,समीर कांबळे, गजानन गुरव, अमीत सर्जे, महेश खोत, विशाल चौगुले, सागर माने,प्रदीप पाटील,महेद्र कोरवी, राजेंद्र व्हरंडेकर, महादेव कुऱ्हाडे व सुशील पाटील यांनी केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *