भर दिवसा जयसिंगपुरात चाळीस लाख 70 हजाराचे दागिने चोरले

भर दिवसा जयसिंगपुरात चाळीस लाख 70 हजाराचे दागिने चोरले

Loading

जयसिंगपूर / प्रतिनिधी

गुरुवारी दिनांक 22 मे रोजी शहरातील श्री भगवान राजाराम बियाणी यांच्या सुखवस्तू या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. 40 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लाकडी कपाट उचकटून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत रविवारी दिनांक 25 रोजी गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (3) आणि 244 /2025 अन्वये गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अज्ञात इसमाने फिर्यादीच्या संमतीशिवाय राहते घरामध्ये प्रवेश करून खोलीतील लाकडी कपाट कशाने तरी उचकटून चाळीस लाख 70 हजाराचे सोन्याचे दागिने चोरल्याचे फिर्यादीत नमूद असून एक डायमंड ब्रेसलेट दोन लाख रुपये, साडेसहा लाखाचा सोन्याचा नवरत्न हार, सात लाख वीस हजाराचा सोन्याचा हार, तेरा लाख पन्नास हजाराचा सोन्याचा कमरपट्टा, साडेचार लाखाचे सोन्याचे नवरत्न झुमके, तीन लाख पंधरा हजाराचे सोन्याचे वेल झुमके, चार लाख पाच हजाराचे सोन्याची बोरबिंदी दोन नग असा एकूण चाळीस लाख 70 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर यांनी फिर्याद दाखल केली असून पोलीस उपनिरीक्षक युनूस इनामदार अधिक तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *