![]()
चंदगड : प्रतिनिधी-


तालुक्यात एसटी डेपोकडे आलेल्या पाच नवीन गाड्यांचा लोकार्पण सोहळा चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चंदगड तालुका हा वाड्यावस्त्यांचा आहे. तालुक्यातील सर्वच वाड्यावस्त्यांवर शाळांची सोय नाही .त्यामुळे अनेक मुलांना शाळेसाठी परगावी जावे लागते. या मुलांची वाहतुकीची सोय व्हावी या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करून चंदगड, गडहिंग्लज, आजरा एसटी डेपो ना नवीन गाड्या द्याव्यात यासाठी आपण आग्रह ल्यामुळे आज चंदगड एसटी डेपोकडे आलेल्या पाच गाड्यांचा लोकार्पण सोहळा होत आहे असे ते म्हणाले. एसटी डेपोच्या व्यवस्थापकांनी शाळा व कॉलेजच्या मुलांची सोय व्हावी यासाठी बस मार्ग व वेळ निश्चित करत असताना शाळा कॉलेजच्या वेळा लक्षात घेऊन त्या पद्धतीचे नियोजन करावे. अशा सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ,मंगेश चिवटे,रवींद्र बांदिवडेकर, अनिल शिवनगेकर,वाहतूक नियंत्रक सतीश पाटील ,जयवंत सुतार, अंकुश गवस, अमेय सबनीस, कलिंग मदार, अशोक गडदे, नंदकुमार गावडे व एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, ड्रायव्हर, कंडक्टर व त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होते.

