जनतेच्या व्यक्तिगत समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध : आमदार शिवाजीराव पाटील

जनतेच्या व्यक्तिगत समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध : आमदार शिवाजीराव पाटील

Loading

चंदगड / प्रतिनिधी-

विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी महागाव व नेसरी जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांची गुरूवार दिनांक 22 रोजी सभा घेतली. यावेळी दोन्हीही जिल्हा परिषद मतदार संघातील विकास कामाबाबत चर्चा झाली. मतदारसंघांमधील गावांतील जनतेच्या व्यक्तिगत समस्या समजून घेतल्या. त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिला. तसेच शासकीय कार्यालयामध्ये जनतेची कामे अधिकाऱ्यांशी बोलून सोडविली जातील असे आश्वासन त्यांनी दिले. तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय, पोलीस स्टेशन, सहाय्यक निबंध यांचा त्याचबरोबर जिल्हा परिषद मतदार संघात शासनाच्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करावा असे आवाहन करीत आमदार पाटील यांनी बांधकाम कामगार योजना, संजय गांधी निराधार पेन्शन योजना, श्रावणबाळ पेन्शन योजना, घरकुल योजना राबवण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे असे आवाहन केले. तसेच भारतीय जनता पार्टी च्या वतीने सुरू असलेल्या सभासद नोंदणी अभियानात सहभागी होऊन जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी. सक्रिय सभासद देखील करण्यात यावेत. असे सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर, नेसरीच्या सरपंच गिरीजा देवी शिंदे, महादेव साखरे, प्रथमेश दळवी, अशोक पांडव, सुभाष चोथे, माधव पोटे, पाटील नितेश कोरी, आप्पासाहेब माने, राजू डवरी, केरबा पाटील, चंद्रकांत भोसले, सुरेश हजारे, भाजप मंडल अध्यक्ष विजय पाटील, दत्ता पाटील, सुरेश पाटील, कृष्णा वाईगडे, सांबरे सरपंच ज्योतीताई खराडे, भाजपा मंडल अध्यक्ष अरुण मोकाशी ,बसवराज कांबळे ,आशिष किंकर,संजय दासनट्टी, माजी सैनिक व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *