रविवारी 25 रोजी भव्य रोजगार मेळावा : गडहिंग्लज मध्ये आयोजन

Loading

गडहिंग्लज : प्रतिनिधी

देशातील बेरोजगारी आता चरम सीमेवर पोहोचली असून युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने गडहिंग्लज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. उद्या रविवारी दिनांक 25 रोजी गडहिंग्लज चंदगड रोड लगतच्या डॉक्टर घाळी कॉलेजमध्ये हा भव्य रोजगार मेळावा होत आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. मतदार संघातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे व सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीच्या निमित्ताने इतरत्र शोधाशोध करत आहेत त्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्धात हेतूने चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यातील तरुणांना नोकरी मिळावी याकरिता हा उपक्रम होत आहे.

ह्या मेळाव्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील असणाऱ्या व बाहेरील कंपन्याचे प्रशासन याप्रसंगी सहभागी होणार आहेत. या भव्य मेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून, सुशिक्षित तरुण तरुणी नोकरीच्या शोधात न लागता छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू करावे याकरता कौशल्य विकास मार्फत वेगवेगळ्या उद्योगधंद्यांच्या बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

तरुणांना परदेशी शिक्षणाची माहिती मिळावी तसेच प्रदेशांमध्ये जाऊन नोकरी ची संधी कशी उपलब्ध होईल याबाबत या रोजगार मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष उभारण्यात आलेला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त कंपन्यां सहभागी आहेत. आमदार शिवाजीराव पाटील यांनी सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना या रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊन आपल्या ला योग्य वाटत असेल अशा कंपनीची निवड करून आपण आपल्या आयुष्याचा मार्ग सुकर करावा असे आव्हान करण्यात केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *