डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या 8 विद्यार्थ्यांना नोकरी

Loading

अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांबरोबर महाविद्यालयाचे सामंजस्य करार

जयसिंगपूर : प्रतिनिधी-

येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील कॉम्प्युटर,आय.टी.व इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशन या तीन विभागामधील आठ विद्यार्थ्यांची निवड प्रोमॅक्सिस सॉफ्टवेअर सोल्युशन व विप्रो पारी प्रा. लिमिटेड या कंपनीमध्ये निवड झाली. कॉम्प्युटर विभागाच्या शर्वरी कुलकर्णी ताहुरा शेख, आयटी विभागाच्या श्रेयश देशमाने, अभिषेक मगदूम, श्रेया माने व इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशन विभागाच्या राधेय पेंडूरकर, श्वेता जाधव, दक्षा निकम, या विद्यार्थ्यांचा स,समावेश आहे. तर नोकरीसाठी ए. आय, ऑटोमेशन, सॉफ्टवेअर, रोबोटिक्स व तत्सम अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांच्या बरोबर आमच्या महाविद्यालयाचे सामंजस्य करार असल्यामुळे हे शक्य झाले असे उद्गार प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड यांनी काढले.

ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम, प्राचार्य, डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. पी. माळगे, विभाग प्रमुख व ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *