चिंचवाडच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहणार – चेअरमन माधवराव घाटगे

वाघजाई यात्रेनिमित्य भव्य कुस्तीच्या मैदानाचे आयोजन

जयसिंगपूर : प्रतिनिधी

चिंचवाड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी श्री गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून जास्तीत-जास्त मदत करण्यासाठी मी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी दिली. चिंचवाड येथे वाघजाई यात्रेनिमित्य आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटणप्रंसगी श्री. घाटगे बोलत होते. यावेळी कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे खजिनदार महाराष्ट्र केसरी पै. अमृतमामा भोसले प्रमुख उपस्थित होते. यावेळी मैदानात ६० हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या.

यावेळी गावातील लक्ष्मी देवालय बांधकामसाठी व गावच्या स्मशानभूमीसाठी आर्थिक मदत व विशेष सहकार्य केल्याबद्दल श्री. घाटगे यांचा सत्कार गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांकाची ‘गुरुदत्त केसरी’ कुस्ती पै. विक्रम शेटे व पै. बाळू अपराध यांच्यात रंगली. गुणांच्या जोरावर पै. बाळू शेटे यांनी पै. अपराध यांच्यावर विजय मिळवत ‘ गुरुदत्त केसरी ‘ चांदीची गदा व रोख ६१ हजार रुपयेचे बक्षिस मिळवले. व्दितीय क्रमांकाची कुस्ती पै. रणजित आगलावे विरुद्ध पै. दीपराज भोसले यांच्यात झाली. यामध्ये पै. आगलावे यांने गुणांच्या जोरावर पै. भोसले यांच्यावर विजय मिळवला. तृतीय क्रमांकाची कुस्ती पै. त्रषिकेश काळे याने पै. रोहित चव्हाण वर विजय मिळवला.

महिला डबल महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी,राष्ट्रीय रायफल खेळाडू अंजली घाटगे, बीएएमएस पदवी घेतली बदल मैथिली भोसले यांचा सत्कार गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे , उदयोजक वरद घाटगे, गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने – देशमुख, शिवाजी सांगले, सरपंच जालिंदर ठोमके, उपसंरपंच अक्षता चौगुले, सर्व ग्रा.प.सदस्य, माजी सरपंच विठ्ठल घाटगे कुमार माने, महादेव गुरव , विजय गोधडे, ज्योती गोधडे, केशव घाटगे , कुमार मिरजे, अजित चौगुले, सुदर्शन घाटगे, राजेंद्र चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी सुनिल चव्हाण , शरद गोधडे, युवराज गोधडे, संदिप कदम, अर्जुन चव्हाण, सुनिल मोरे, संतोष गोधडे, प्रकाश पाटोळे, प्रमोद चव्हाण, नायकू गोधडे व सर्व कुस्ती समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.