आरोग्य व होमिओपॅथी जनजागृतीचा अनोखा उपक्रम

जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील डॉ. जे. जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, जयसिंगपूर यांच्या वतीने “होमिओथॉन 2026” या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांच्या 271 व्या जयंतीनिमित्त तसेच जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त हा उपक्रम शुक्रवार, दि.10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6:30 वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हा.चेअरपर्सन अॅड. डॉ. सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ. सुनील अडमुठे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश नायर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
“होमिओथॉन 2026” हा उपक्रम आरोग्य जनजागृती आणि होमिओपॅथी उपचार पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेसाठी 5 कि.मी. व 3 कि.मी. असे दोन ट्रॅक ठेवण्यात आले असून, मार्ग महाविद्यालयाच्या कॅम्पसपासून जयसिंगपूर रेल्वे स्टेशनपर्यंत निश्चित करण्यात आला आहे.
या मॅरेथॉनमध्ये सुमारे 250 ते 300 पदवी, पदव्युत्तर, इंटर्नशिपचे विद्यार्थी, अध्यापन व बिगर अध्यापन कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी तसेच प्रॅक्टिशनर्स सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विजयराजे कर्णिक, डॉ. ऐश्वर्या गुरव आणि डॉ. प्रियांका पवार यांनी केले आहे.
या उपक्रमास आशा होमिओपॅथी, मत्तिकोप होमिओ फार्मसी, जायंट्स ग्रुप ऑफ जयसिंगपूर सहेली, वोल्का मिनरल्स, सुप्रसिद्ध जाधव ग्रुप तसेच पूर्वा प्रिंटर्स, जयसिंगपूर यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.