ट्रॅप कॅमेरा पोत्यात भरून घराजवळ ठेवला

ट्रॅप कॅमेरा पोत्यात भरून घराजवळ ठेवला

Loading

चोरास २ दिवसाची पोलीस कोठडी

चंदगड / प्रतिनिधी-
पाटणे वनपरिक्षेत्रातील परिमंडळ तुडीये मधील हाजगोळी नियतक्षेत्रामधील जं.क.क्र.९७ मध्ये गस्त करीत असताना निसर्ग पाऊल वाटेवर लावलेला ट्रॅप कॅमेरा चोरीला गेला होता. या चोरीचा तपास सुरु असता आरोपी गौतम सुभाष निकम (रा. तुर्केवाडी, ता. चंदगड) याने चोरी केल्याचे उघडकीस आले. त्याने सदर ट्रॅप कॅमेरा चोरल्याचे कबुल केले. ट्रॅप कॅमेरा एका पोत्यामध्ये भरून घराजवळ ठेवल्याचे सांगीतले. त्याने दाखवलेल्या पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये ट्रॅप कॅमेरा फोडलेल्या अवस्थेत मिळाला. माकड या वन्यप्राण्याच्या मासाचा सुखलेला तुकडा, शिकारीची फासकी (सापळा), सांबर या वन्य प्राण्याची शिंगे, घार, लांडोर यांची पिसे, शिकारीसाठी वापरण्यात येणारी बाणाची लोखंडी पाती आदी साहित्य मिळाले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चंदगड यांचे समोर हजर केले असता आरोपीला दोन दिवसाची वन कोठडी सुनावली.सदर गुन्हे कामाचा पुढील तपास उपवनसंरक्षक, कोल्हापुर जी. गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे,यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणे प्रशांत आवळे व वनपाल बाळासाहेब भांडकोळी, व वनरक्षक मेघराज हुल्ले, प्रकाश मारुती शिंदे, सचिन अडसुळ, श्रेयश रायके, खंडु कातखडे, पांडुरंग कुलाळ, खंडु कोरे, अमित माने, पास्कल डिसोजा व वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर व शुभम बांदेकर व वन्यजीव बचाव पथक हाजगोळी हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *