शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज

शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

Loading

चेअरमन अरुण डोंगळे यांचे प्रतिपादन

कोल्हापूर / प्रतिनिधी

   दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी दुग्ध व्यवसायातील आव्हाने बहुआयामी दृष्टिकोनाच्या मार्गाने हाताळून दूध उत्पादन वाढीसाठी व जनावरांचे प्रजनन यासाठी संतुलित आहाराची उपलब्धता सुनिश्चित करून शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले. कोल्हापूरजिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) आणि कंपाऊंड लाइव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चरर्सअसोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई (क्लाफ्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'शाश्वत दुग्धव्यवसाय व नवनिर्मित तंत्रज्ञान' या विषयावरील एक दिवशीय परिसंवाद कार्यशाळेत ते बोलत होते. 
   ही कार्यशाळा रेसिडेन्सीक्लब, कोल्हापूर येथे नुकतीच संपन्न झाली. परिसंवाद कार्यशाळेमुळे दुग्ध व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि व्यवस्थापनाच्या पद्धतीचीमाहिती मिळाली या माहितीचा उपयोग दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी होईल असा आत्मविश्वासही डोंगळे यांनी व्यक्त केला. तर क्लाफ्मा हि पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची देशपातळीवरील संस्था असून जनावरांच्या संतुलित आहारा बाबत जनजागृतीसाठी असे परिसंवाद देशभर आयोजित करते. अशी माहिती  क्लाप्मा ऑफ इंडियाचे चेअरमन दिव्या कुमार गुलाटी यांनी दिली.

  यावेळीआयुर्वेदिक औषधोपचार, ताण तणाव व्यवस्थापन आणि टी.एम.आर.चे फायदे, पंजाब मधील प्रगतदुग्धव्यवसायाची यशोगाथा, म्हैस संगोपन, पशु पोषण आहार व्यवस्थापन, छोटे दूध उत्पादकशेतकऱ्यांसाठी सायलेज निर्मिती व वापर या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले.

मान्यवरांचे स्वागत क्लाप्मा ऑफ इंडियाचे माजी चेअरमन एस.व्ही.भावे यांनी केले. प्रायोजक व तज्ञ वक्ते यांना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक नवीद मुश्रीफ, अजित नरके व संघाचे संचालक, क्लाफ्मा ऑफ इंडियाचे चेअरमन दिव्या कुमार गुलाटी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, अजित नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांची मनोगते झाली. 

या कार्यशाळेमध्ये दुग्ध व्यवसायमध्ये काम करणारे तज्ञ डॉक्टर, अधिकारी, दूध उत्पादक, महिला या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले. सूत्रसंचालन डॉ.एम.पी.पाटील यांनी केले. आभार डॉ.सैकत साहा यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *