जयसिंगपूर : प्रतिनिधी
चेंबर ऑफ अँडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँन्ड मिडियम बिझनेस(CASMB) मुंबई यांचे मार्फत राष्ट्रीय स्तरावरील दिला जाणारा प्रतिष्ठेचा *उत्कृष्ट उद्योजक प्रेरणा अवार्ड हा पुरस्कार चकोते ग्रुपचे चेअरमन उद्योजक आण्णासाहेब चकोते यांना जेष्ठ अभिनेते डाॅ. नितीश भारद्वाज( महाभारत सिरीयल मधील श्रीकृष्ण पात्र साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते व माजी संसद सदस्य) यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मान पत्र व शिल्ड असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणूण अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पश्चिम विभागीय संचालिका प्रिति
चौधरी व इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलपती पद्मभूषण प्रोफेसर जे बी जोशी हे उपस्थित होते.भारतरत्नम हाॅल, अंधेरी, मुंबई येथे झालेल्या शानदार सोहळ्यात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यावेळी चेंबर ऑफ अँडव्हान्समेंट ऑफ सपोर्ट स्मॉल अँन्ड मिडियम बिझनेस(CASMB) मुंबई. व F2F कार्पोरेट कन्सल्टंटस प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणा महिला सक्षमीकरण शिखर परिषद आणी CASMB चा सहावा स्थापणा दिन संपन्न झाला
CASMB चे अध्यक्ष डॉ. प्रबोध हालदे यांनी स्वागत केले तर निलेश लेले यांनी आभार व्यक्त केले. यावेळी डॉ. शिल्पा वोरा (मेरिको लि.) विजय सिरसाठ (महाराष्ट्र शासन), अश्विनी पाबळे (रेवंता फॅशनस प्रा. लि.) आणी सुश्री मुबारका लोखंडवाला (MML ग्लोबल अँडवायझरी) यांनी महिला उद्यमींसाठी नवोन्मेश धोरण सहाय्य आणि विकासाच्या संधी या विषयावर सखोल विचार मांडले.
यावेळी प्रेरणा महिला सक्षमीकरण शिखर परिषदे मध्ये आण्णासाहेब चकोते यांनी आपल्या इंडस्ट्रिज मध्दे ग्रामीण भागातील असंख्य महिलांना रोजगार देवून महिला सक्षमीकरण मोहीमेस फार मोठे योगदान दिले बद्दल त्यांच्या या कार्याची विशेष दखल घेवून मान्यवरांनी गौरवोदगार काढले.
उद्योजक आण्णासाहेब चकोते यांच्या उद्योग क्षेत्रातील कार्याची दखल घेवून भारत सरकार महाराष्ट्र शासन व मान्यवर संस्थाचे विविध पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत. उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य केले आहे. ग्रामिण भागातील हजारो महिला, युवक, दिव्यांग बांधवाना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगाणा, गुजरात या राज्यासह संपूर्ण देशभरातील असंख्य वितरक व विक्रेत्यांद्वारे लाखो ग्राहकांना चकोते ग्रुपची दर्जेदार बेकरी, नमकीन व स्विट उपलब्ध करून दिली आहेत त्याचबरोबर चकोते ग्रुपची उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील उपलब्ध झाल आहेत.
‘नांदणी सारख्या ग्रामीण भागातून सुरु झालेला हा प्रवास आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचला आहे.चकोते यांची नुकतीच ऑल इंडीया ब्रेड असोशिएशनच्या सिनियर व्हाॅइस प्रेसिडंट पदी सलग नवव्यांदा निवड झाली आहे या असोसिएशनच्या माध्यमातून विशेशतः पश्चिम भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगातील उद्योजकांना बेकरी उद्योगसाठी मार्गदर्शकाची भुमिका पार पाडत आहेत. नवीन टेक्नॉलॉजी, जागतीक स्पर्धा, शासनाचे विविध नियम, भारतीय बाजारपेठेत बेकरी उत्पादनांविषयी जागरुकता निर्माण करणे अशा विविध विषयावर बहुमोल मार्गदर्शन करिता आहेत. देशपातळीवरील या कार्याची दखल घेवून या CASMB संस्थेने चकोते यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
