अतिक्रमण निर्मूलन पथकासह मुख्याधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव
जयसिंगपूर : प्रतिनिधी-
पालिकेच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथकावर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जयसिंगपूर मंडळ कौतुकाचा वर्षाव करत आहे. शहरातील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई पालिकेने गेल्या आठवड्यात केली. या धाडसी आणि योग्य कारवाईचे हे कौतुक असल्याची चर्चा सुरु आहे. अतिक्रमण काढल्यामुळे त्या भागातील नागरिकांना योग्य त्या सुख सुविधा वेळेत मिळतील. यापूर्वी एखादी रुग्णवाहिका, घंटा गाडी अग्निशामक वाहिका या भागात जाण्यास अतिक्रमणामुळे वाट नव्हती. पण आता या कारवाई मुळे वरील प्राथमिक व अनिवार्य सेवा नागरिकांना वेळेत मिळतील.
विशेष म्हणजे या प्रभागाचे नूतन नगरसेवक संतोष जाधव या अतिक्रमण कारवाई वेळी स्वतः समोर उभे राहून कारवाई पूर्ण करून घेत होते. अशा प्रकारे एखादा लोकप्रतिनिधी आपल्याच प्रभागातील अतिक्रमण काढतांना समोर उभारण्याची पहिलीच वेळ जयसिंगपूर मध्ये पाहायला मिळाली.
यामुळे मुख्याधिकारी टीना गवळी मॅडम व अधिकारी राधिका हावळ, जावेद मुल्ला, निखिल पाटील, आरोग्य विभागाचे संदीप कांबळे, विशाल धनवडे, किशोर बनसोडे, चेतन कांबळे, मोहन पाटोळे, प्रमोद थोरात, बाबासाहेब हाके, प्रमोद पाटील व बंडगर यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस विकी देशमुख, सुरेश जाधव, महेश स्वामी, नितीन देसाई, अमित चौगुले, राजकुमार बलदवा उपस्थित होते.
