महायुतीच्या यशात आमदार यड्रावकर यांचा सिंहाचा वाटा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

महायुतीच्या यशात आमदार यड्रावकर यांचा सिंहाचा वाटा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Loading

शिरोळ तालुक्यातील नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार संपन्न

जयसिंगपूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातल्या महायुतीच्या यशामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सिंहाचा वाटा आहे. संकटाला संधी बनवणे हे आमदार यड्रावकर यांच्याकडून शिकावे लागेल. विकास कामांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याचा कायापालट झालेला आहे. यापुढेही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा जयसिंगपूर येथे संपन्न झाला. याप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते.
स्वागत सतिश मलमे यांनी केले. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर पुढे म्हणाले,
गेल्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. शिरोळ तालुक्यात मिळालेला विजय हा संघटित प्रयत्नांचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. नेतृत्व करताना सर्वांना विश्वासात घेणे, दबावाला बळी न पडता ठाम भूमिका घेणे आणि विकासाला प्राधान्य देणे हे आमदार यड्रावकर यांनी दाखवून दिले आहे.
पंचायत समिती व जिल्हा परिषद ही भविष्याच्या नेतृत्वाची शाळा आहे. निवडून आलेल्या सदस्यांनी जनतेचा विश्वास जपून काम करावे, दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पाणी व्यवस्थापन, पूरस्थिती, तसेच तालुक्यातील आरोग्य सुविधा, मानसिक आरोग्य रुग्णालय व कॅन्सर उपचार केंद्र यांसारख्या प्रकल्पांना गती देण्याबाबत सरकार कटिबद्ध आहे. संघटन मजबूत ठेवून विकासाच्या दिशेने पुढे जाऊया, असे आवाहन त्यांनी केले.
शिरोळ तालुक्यातील विकासकामांबरोबरच पूर व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. अलमट्टी व हिप्परगी धरणांच्या पाणीपातळीमुळे तालुक्यावर परिणाम होत असल्याने पाणी नियोजन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून पाणीस्तर नियंत्रित ठेवणे, भविष्यातील पूरधोका कमी करणे आणि शेतकरी व नागरिकांचे संरक्षण करणे यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मगरींच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी स्वतंत्र ‘क्रोकोडाइल पार्क’ उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. यामुळे नागरिकांची सुरक्षा वाढेल तसेच पर्यटनाच्या दृष्टीनेही तालुक्याला नवी ओळख मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. वनविभाग व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने याबाबत आराखडा तयार जाणार असल्याचे सांगितले.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, तालुक्यातील निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट करताना महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि समविचारी नेते एकत्र येऊन राजश्री शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. पराभूत कार्यकर्त्यांनी खचून न जाता जनतेशी नाळ घट्ट ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सर्वांना विकासासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासावर भर देत नांदणी, कुरुंदवाड, खिद्रापूर येथील मंदिरांसाठी मोठ्या निधीची तरतूद केल्याची माहिती दिली. तसेच मगरींच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाय म्हणून क्रोकोडाइल पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडून शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, महायुतीने एकत्र राहून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. काहींच्या वेगळ्या भूमिकेमुळे निवडणुकांत फटका बसला, तरीही कार्यकर्त्यांनी खचू नये, असे आवाहन त्यांनी केले. पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठ्या निधीची तरतूद सुरू असल्याची माहिती दिली. मगरींच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाय म्हणून क्रोकोडाइल पार्क उभारणीची मागणी केली असून शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही विनंती आमदार यड्रावकर यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, प्राचीता कोळी, श्रद्धा गायकवाड, उत्तरा शिंदे पंचायत समिती सदस्य मिलिंद कुरणे, मनीषा कदम, सीमा म्हैशाळे, दिप्ती जाधव, बंटी उर्फ प्रतीक पाटील, प्रवीण देसाई, फजलेअली पाटील, नाना उपाध्ये, बाबासो वनकोरे, अविनाश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगर पालिकेचे स्विकृत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
तसेच राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविलेल्या उमेदवारांचा देखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रकाश पाटील टाकवडेकर, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, अमरसिंह पाटील, भवनिसिंह घोरपडे सरकार, प्रमोददादा पाटील, सागर शंभुशेटे, दिलीप पाटील, धनाजीराव जगदाळे, सुभाषसिंग रजपूत, महादेवराव धनवडे, रावसाहेब भिलवडे, शितल गतारे, चंद्रकांत मोरे, मिलिंद भिडे, विकास पाटील, शामगोंडा पाटील यांच्यासह राजश्री शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले.