स्व.श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे सरकार यांना श्री दत्त साखरच्या वतीने विनम्र अभिवादन

स्व.श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे सरकार यांना श्री दत्त साखरच्या वतीने विनम्र अभिवादन

Loading

शिरोळ : प्रतिनिधी

श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी दत्त उद्योग समूहाचे संचालक उद्यान पंडित गणपतराव अप्पासाहेब पाटील यांनी स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे सरकार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व.दिनकररावजी यादव यांच्या पूर्णकृती पुतळ्यास संचालक एडवोकेट प्रमोद वसंत पाटील व स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व्हाईस चेअरमन शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांनी व स्व. दत्ताजीराव कदम यांच्या पूर्णकृती पुतळ्यास चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील,सिदगोंडा बाबगोंडा पाटील, दरगु माने गावडे, विजय सूर्यवंशी, सुरेश कांबळे, बाळासाहेब पाटील (हालसवडे) कामगार संचालक प्रदीप बनगे, मंजूर खान मिस्त्री, तसेच मनोहर माळी, दीपक बन्ने इतर मान्यवर तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगन्ना, वर्क्स मॅनेजर आय एम मुलानी, प्रोडक्शन मॅनेजर एम एस जाधव, सिव्हिल इंजिनियर जयंता जंगम, यशवंत माने, सिविल ओव्हरसीयर अनिल सुतार,पर्यावरण मॅनेजर सुनील पाटील, एच आर मॅनेजर जे बी देसाई, ऊर्जांकुर मॅनेजर व्ही आर इंगळे, गेस्ट हाऊस इन्चार्ज शक्तीजित गुरव, गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील, सुरक्षा अधिकारी पीएम चौगुले, पी ए टू चेअरमन विलास माने, ओ एस अशोक चौगुले,कामगार युनियनचे सेक्रेटरी अरुण पाटील याचप्रमाणे कामगार सोसायटी, कामगार कल्याण मंडळ, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ, श्री दत्त भंडार या संस्थांचे पदाधिकारी सभासद, कार्यकर्ते आणि कारखान्याचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.