![]()
श्री गुरुदत्त शुगर्स तर्फे अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण

जयसिंगपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रवर दुःखाची शोककळा पसरली. स्पष्ट, सडेतोड बोलणारे व एखादे काम होणार नसेल तर स्पष्टपणे सांगणारे व्यक्तीमत्व म्हणून ते ओळखले जात होते. महाराष्ट्रातील साखर उद्योगातील ते अभ्यासू व जाणते नेतृत्व होते. त्यांच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्रातील सर्व साखर उद्योग पोरका झाला असल्याची भावना श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केले.कारखाना कार्य स्थळावर आयोजित केलेल्या शोकसभेत श्री घाटगे बोलत होते. यावेळी गुरुदत्त शुगर्स तर्फे अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिन्यात आली.
पुढे बोलताना श्री घाटगे म्हणाले,महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या धोरणासंदर्भात व अडचणी संदर्भात आम्ही विस्माच्या माध्यमातून बऱ्याच वेळा अजितदादा पवार यांच्या सोबत चर्चा केली. साखर उद्योगाला उर्जितअवस्था आणण्यासाठी व साखर धोरणाबाबत त्यांनी केंद्र सरकारच्या दरबारी सातत्याने पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेणेबाबत महत्त्वाची भूमिका बजावली.श्री गुरुदत्त शुगर्स च्या उभारणीमध्ये त्यांनी मोलाची मदत केली.त्यांच्या अचानक अपघाती निधनामुळे महाराष्ट्राची सहकार चळवळ व साखर कारखानदारी यामध्ये मोकळी निर्माण झाली आहे.
यावेळी कारखान्याचे एक्झिक्युट डायरेक्टर राहुल घाटगे, संचालक शिवाजीराव माने -देशमुख, शिवाजी सांगले, धोंडीराम नागणे, अण्णासाहेब पवार,बाळासाहेब पाटील व कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
