दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात आज आमदार यड्रावकर यांचा प्रचार दौरा

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी
राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीने दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचाराला वेग येणार असून शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा भव्य प्रचार दौरा आज संपन्न होणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद उमेदवार उत्तरादेवी विजितसिंह शिंदे तसेच पंचायत समितीचे उमेदवार बाबासाहेब वनकोरे व अविनाश पाटील यांच्या प्रचारार्थ थेट मतदारांशी संवाद साधण्यात येणार आहे.
या प्रचार दौऱ्याची सुरुवात सकाळी टाकळीवाडी येथून होणार असून त्यानंतर दत्तवाड, घोसरवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, टाकळी, राजापूरवाडी, खिद्रापूर व राजापूर या गावांमध्ये प्रचार दौरा पार पडणार आहे. प्रत्येक गावात आमदार यड्रावकर हे स्थानिक नागरिकांशी संवाद साधत शाहू आघाडीच्या विकासात्मक धोरणांची माहिती देणार आहेत.
शिरोळ तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेती व ग्रामीण विकासाच्या विविध कामांना गती मिळाली आहे. हाच विकासाचा प्रवाह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी शाहू आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन या दौऱ्यातून करण्यात येणार आहे. दत्तवाड मतदारसंघात शाहू आघाडीला वाढता प्रतिसाद मिळत असून या प्रचार दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.