पारीख पॅंथर्स “आर पी एल 20 26” चषकाचा मानकरी

पारीख पॅंथर्स “आर पी एल 20 26” चषकाचा मानकरी

Loading

भारत 500 संघ पराभूत

जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथे रविवारी संपन्न झालेल्या राजस्थानी प्रीमियर लीग हाफ पीच क्रिकेट सामन्यांमधील अंतिम सामन्यात पारीख पॅंथर्स या संघाने “आर पी एल 20 26” हा चषक पटकावला. अतिशय रोमहर्षक सामना खेळून भारत 500 या संघाला पराभूत केले. येथील आयोध्या मालू क्रीडा नगरीमध्ये हे सामने संपन्न झाले. या तीन दिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये जवळपास 10 संघ सहभागी झाले.

मारवाडी युवा मंचच्या वतीने राजस्थानी प्रीमियर लीग क्रिकेट सामने भरवले जातात. आर पी एल चषकाचे यंदाचे हे 14 वर्षे आहे.

या सामन्यांचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान रविवार 18 जानेवारी रोजी अंतिम सामना पारीक पँथर्स आणि भारत 500 यांच्यात झाला. भारत 500 या संघाने 55 धावांचे लक्ष उभे केले. तर पारीख पॅंथर्सच्या खेळाडूंनी रोमहर्षक क्रीडा प्रदर्शन केले. त्यांनी 18 चेंडू शिल्लक राखून 56 धावा काढल्या आणि आरपीएल 2026 पटकावला. तब्बल 12 वर्षानंतर पारीख पॅंथरसने दुसऱ्यांदा आरपीएल चा चषक पटकाविला. रोटरी ग्रुप ऑफ ट्रेड सिटीचे माजी अध्यक्ष व उद्योगपती राकेश पारीख हे या संघाचे प्रमुख आहेत. नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आणि उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते रु.21 हजार रूपयांचा धनादेश आणि आरपीएल 2026 ची ट्रॉफी देऊन पारीख पॅंथरस या विजेता संघाला सन्मानित करण्यात आले.

सामना जिकल्यानंतर मैदानावर मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. युवराज शाह यांच्या भारत 500 हा संघ उप विजेता ठरला तर दिपक बियाणी यांच्या बियाणी टायटन्स हा तिसऱ्या क्रमांकाचा संघ ठरला. या तिन्ही संघाना मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे आर पी एल ची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

सलग तीन दिवस चाललेल्या हे हाफ पीच क्रिकेट सामने पाहण्यासाठी क्रिकेट शौकिनांची प्रचंड गर्दी होती. विजेत्या पारीख पँथर्स या संघाला शुभेच्छा देण्यासाठी मैदानावर शुभेच्छांच्या वर्षाव झाला. त्याचबरोबर बक्षीस वितरण समारंभांमध्ये मॅन ऑफ द मॅच , मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट विकेट किपर, बेस्ट कॅचर यांना देखील गौरवण्यात आले.