जयसिंगपूर येथे रविवारी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर येथे दक्षिण भारत जैन सभेचे ग्रॅज्युएटस असोसिएशन यांच्यावतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा रविवार (ता.१८) रोजी सकाळी ९.३० वाजता सोनाबाई इंगळे सभागृह, गल्ली नंबर ४ येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यात जेष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर (पुणे) हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील आहेत.
दहावी, बारावी परिक्षेनंतर महाविद्यालयीन शिक्षण व करिअरची नेमकी दिशा ठरविण्यासाठीचे मार्गदर्शन या मेळाव्यात मिळणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र शासमानाकडून मिळणा-या शिष्यवृत्ती, ईडब्ल्यूएस व टीएफडब्ल्यूएस याचा उपयोग प्रवेशासाठी लागणा-या कागदपत्रे, सीट डिस्ट्रीव्यशन आणि श्रेणी (कॅटेगीरी) आरक्षण याविषयाची माहीती मिळणार आहे.
दहावी-बारावीच्या नंतरच्या महाविद्यालयीन प्रवेश, उपलब्ध पर्यायांची माहिती, अभियांत्रिकी, मेडिकल, आयटीआय, कृषी पदवी, एम.बी.ए., डिफेन्स यासह विविध क्षेत्रातील करिअरच्या संधीची सखोल मार्गदर्शन या मेळाव्यात मिळणार आहे. तरी सदर कार्यशाळेस विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन दक्षिण भारत जैन सभा, ग्रॅज्युएटस असोसिएशनने केले आहे.